Amravati Crime News: अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून राज्यस्थानमध्ये विकलं, मात्र एका निर्णयामुळे ती वाचली...
Amravati Crime News: अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नराधमाने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून आपल्या सोबत राजस्थानला नेलं आणि तिथे तिचा सौदा करून तिला विकलं.
Amravati Crime News: अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नराधमाने अल्पवयीन मुलीला (minor girl) आमिष दाखवून आपल्या सोबत राजस्थानला नेलं आणि तिथे तिचा सौदा करून तिला विकलं. ही घटना अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात अमरावती पोलिसांना यश आलं आहे. मुलीने आपली राज्यस्थानवरून सुटका करून अमरावती पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलिसांनी (Police) माहिती देताना सांगितलं आहे की, या अल्पवयीन मुलीला (minor girl) आमिष दाखवून आणि भूलथापा देत तीच लग्न राजस्थानमध्ये (Rajyasthan) लावून एका कुटुंबाकडे तिला पाठवण्यात आलं. यादरम्यान, घडलेल्या घटनेबद्दल मुलीच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती नव्हती. मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात मिसिंगची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी त्या अनुषंगाने मुलीचा शोध देखील घेण्यास सुरुवात केली. हे सर्व घडत असताना पीडित मुलगी राजस्थानमध्ये राहत असताना तिला आपल्या सोबत काही चुकीचं घडत असल्याचं लक्षात आलं. यानंतर मुलीने योग्य वेळ साधून तिथून पळ काढला आणि अमरावतीत आली. यानंतर मुलीने आपल्या सोबत घडलेली घटना पोलिसांना सांगितली आणि याविरोधात तक्रार नोंदवली. मुलीच्या तक्रारीनंतर पोलीस ही सक्रिय झाले आणि या गुन्ह्याचा छेडा लावण्यास गुंतले. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत असताना तीन आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले हे तीन आरोपी मुलींना फूस लावू इतर राज्यात विकत असलेल्या टोळीचे सदस्य असल्याचा पोलिसांना संशय आहे. या आरोपींची आधी अशा प्रकारे किती मुलींना आमिष दाखवून बाहेरील राज्यात त्यांचा सौदा केला आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसेच या टोळीतील आणखी सदस्यांची माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे. ज्यांचा शोधे ते घेत आहेत.
Bhiwandi: दीड वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण दीड लाखांना विकलं
दरम्यान, भिवंडीमध्ये काही दिवसांपूर्वी लहान मुलाच्या तस्करीचं प्रकरण आलं होतं. दीड वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण करुन विकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या तावडीतून त्या चिमुरड्याची सुखरुप सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. गणेश नरसय्या मेमुल्ला (वय, 38) भारती सुशील शाहु (वय ,41) आणि आशा संतोष शाहू (वय, 42) असे अटक आरोपींचे नावे आहे. आरोपीमध्ये या दोन बहिणीचा समावेश असल्याचे समोर आले. तर सिद्धांत असे सुखरूप सुटका झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.