'पुष्पा 2'ने शाहरुख, सनी देओलला पाणी पाजलं, पण श्रद्धा कपूरच्या स्त्री-2 चा 'हा' रेकॉर्ड अजूनही अबाधितच?
Pushpa 2 : पुष्पा 2 हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांत चालू आहे. या चित्रपटाने अनेक बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत.
Pushpa 2 Box Office Collection Day 45 : गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात अल्लू अर्जुन या धडाडीच्या अभिनेत्याचा पुष्पा-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला. 5 डिसेंबर 2024 रोजी आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चक्क अनेक रेकॉर्ड्स मोडले. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने शाहरुख खान, सनी देओल यासारख्या बड्या अभिनेत्यांनाही पाणी पाजलं. पण श्रद्धा कपूरच्या स्त्री-2 चित्रपटाचा एक रेकॉर्ड मात्र पुष्पा-2 या चित्रपटाला मोडता येणार का? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सर्व रेकॉर्ड केले ब्रेक
गेल्या 45 दिवसांपासून हा चित्रपट सिनेमागृहांत चालू आहे. या काळात पुष्पा-2 या चित्रपटाने चांगलाच मोठा गल्ला जमवला. या चित्रपटाने इतर चित्रपटांचे कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. 17 जानेवारी रोजी कंगना रणौतचा इमर्जन्सी आणि रवीना टंडनच्या मुलीचा आझाद हा चित्रपट प्रदर्शित झाला. असे असूनही या पुष्पा-2 या चित्रपटानेच सर्वांना आकर्षित केलंय. असे असताना आता हा चित्रपट स्त्री-2 या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुष्पा-2 चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
पुष्पा-2 या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात तब्बल 725.8 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 264.8 कोटी रुपये कमवले होते. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची कमाई घटली. तरीदेखील हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात 129.5 कोटी रुपये कमवू शकला. चौथ्या आणि पाचव्या आठवड्यात पुष्पा-2 ने अनुक्रमे 69.65 आणि 25.25 कोटी रुपये कमवले.
सहाव्या आठवड्याचा शेवटी म्हणजेच 43 व्या दिवशी या चित्रपटाने 9.7 कोटी रुपयांची कमाई केली. तर 44 व्या दिवशी हा चित्रपट 95 लाख रुपये कमवू शकला. आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 1226 कोटी रुपये झाली आहे.
स्त्री-2 चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक करणार का?
या चित्रपटाने बाहुबली 2 या चित्रपटाचा हायस्ट ग्रॉसिंग इंडियन फिल्म हा रेकॉर्ड पुष्पा 2 या चित्रपटाने अगोदरच मोडलेला आहे. त्यानंतर जवान, स्त्री-2 तसेच गदर-2 या चित्रपटांनाही मागे टाकून सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हा विक्रम पुष्पा-2 या चित्रपटाने आपल्या नावावर केला आहे. मात्र स्त्री-2 या चित्रपटाचा एक रेकॉर्ड पुष्पा- 2 या चित्रपटाला अजूनही ब्रेक करता आलेला नाही. स्त्री-2 या चित्रपटाने 45 व्या दिवशी कमाईचा एक रेकॉर्ड केलेला आहे. या चित्रपटाने 45 व्या दिवशी 2.1 कोटी रुपये कमवले होते. त्यामुळे आता 45 व्या दिवसाचा हा रेकॉर्ड पुष्पा-2 मोडणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
चित्रपटाचे नव्हा व्हर्जन रिलीज
दरम्यान, पुष्पा 2 या चित्रपटात आणखी 20 मिनिटांचे सीन टाकण्यात आले आहेत. म्हणजेच आता जो कोणी हा चित्रपट पाहायला जाईल, त्याला हे 20 मिनिटांनी वाढवलेला पुष्पा-2 हा सिनेमा पाहता येईल. अजूनही हा चित्रपट सिनेमागृहांत चालू आहे. या चित्रपटाचेन 20 मिनिटांनी वाढवलेले व्हर्जन 17 जानेवारी रोजीच रिलीज करण्यात आले आहे.
हेही वाचा :