Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरकडून प्रेमाची कबुली? बॉयफ्रेंडसोबत ट्युनिंग, मॅचिंग नाईट सूटमधील फोटो शेअर करत म्हणाली...
Shraddha Kapoor Boyfriend Rahul Mody : श्रद्धा कपूरने तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड कोण आहे, जाणून घ्या.
Shraddha Kapoor Rumoured Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोने सध्या लक्ष वेधलं आहे. तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्याने आता चर्चांना उधाण आलं आहे. सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्यांच्या पर्सनल लाईफचीही तितकीच चर्चा असते, त्यामुळे आता नेटकऱ्यांचं लक्ष याकडे वेधलं आहे.
श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल
अभिनेत्री श्रद्धा कपूर तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. श्रद्धाचे फक्त भारतातच नाही, जगभरात खूप चाहते आहेत. स्त्री 2 चित्रपटानंतर श्रद्धा कपूरचू क्रेझ प्रचंड वाढली आहे. श्रद्धा कपूरच्या बॉयफ्रेंडच्या बातमी सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. आता तिने रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा कोझी फोटो शेअर केल्याने पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
श्रद्धा अन् राहुलची ट्विनिंग
श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने रुमर्ड बॉयफ्रेंड राहुल मोदीला टॅगही केलं आहे. श्रद्धाने मॅचिंग नाईट वेअरमधील फोटो शेअर करत त्यासोबत रेड हार्ट इमोजीही शेअर केला आहे. श्रद्धा कपूर आणु राहुल मोदी यांच्या रिलेशनशिपची चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून सुरु आहे. मात्र, अद्याप त्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या रिलेशनशिपची चर्चा
श्रद्धा कपूरने या आधीही इंस्टाग्रामवर राहुल मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यावेळी तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'माझे हृदय जपून ठेव, पण कृपया माझी झोप मला परत दे.' राहुल मोदीसोबतची श्रद्धाची ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती. श्रद्धा कपूरचा रुमर्ड बॉयफ्रेंड लेखक आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :