एक्स्प्लोर

अशोक चव्हाणांच्या मुलीसाठी हाकेंचे भोकरमध्ये तोडपाणी, OBC उमेदवार मागे घ्यायला लावला; अमोल मिटकरींचा आरोप, ऑडिओ क्लिप शेअर 

Amol Mitkari Vs Laxman Hake : अमोल मिटकरींनी शेअर केलेली ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा प्रहार पक्षाच्या शेखर कुंटे यांनी केला. लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केल्याचा आरोप त्यांनी केला. 

अकोला : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाकेंमधील वाद थांबवण्याचं नाव घेत नाही. अमोल मिटकरींनी ट्वीट करत हाकेंवर टीकेचा आसूड ओढला. विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली असा आरोप त्यांनी केला. अशोक चव्हाणांच्या मुलीला निवडून आणण्यासाठी लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केलं आणि दबाव टाकून ओबीसी उमेदवार मागे घ्यायला लावा असा आरोपही केला. मिटकरींनी त्यासंबंधी एक ऑडिओ क्लीप शेअर केली. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Amol Mitkari Tweet On Laxman Hake : काय म्हटलंय मिटकरींनी? 

अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप शेअर करत म्हटलंय की, "सदर ऑडिओ ही भोकर मतदारसंघातील आहे. याच मतदारसंघात एका OBC बांधवाचा राजकीय बळी देऊन हाक्याने आर्थिक देवाण-घेवाण केली आणि अर्ज मागे घ्यायला भाग पाडले. आता या मतदारसंघात आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे सुज्ञास सांगणे न लगे".

Amol Mitkari Vs Laxman Hake : काय आहे नेमकं प्रकरण? 

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत नामदेव आईलवाड नावाच्या उमेदवाराने प्रहार पक्षाकडून भोकर विधानसभेसाठी अर्ज भरला होता. पण शेवटच्या दिवशी त्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी लक्ष्मण हाकेंचा दबाव होता असं तो म्हणाल्याचं एका ऑडिओ क्लिपमधून ऐकू येतं. या मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर अशोक चव्हाण यांच्या कन्या सुजया चव्हाण निवडून आल्या आहेत. 

Amol Mitkari Audio Clip : ती क्लिप खरी, प्रहारच्या शेखर कुंटे यांचा दावा

अमोल मिटकरींनी ट्वीट केलेली ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचं भोकरमधील प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर कुंटे यांनी स्पष्ट केलं. भाजपनं आर्थिक तडजोड करून भोकरचा उमेदवार फोडला असा दावा त्यांनी केला. तर या सगळ्या प्रकरणात लक्ष्मण हाके यांनी तोडपाणी करत ओबीसीचे उमेदवार पाडले असा आरोपही त्यांनी केला. 

Prahar Shaikhar Kunte : शेखर कुंटेंचे लक्ष्मण हाकेंवर आरोप काय? 

अमोल मिटकरींनी केलेल्या दाव्यावर बोलताना शेखर कुंटे म्हणाले की, नामदेव आईलवाड यांनी शेवटच्या दिवशी, 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेतला. आपल्याशी कोणतीही चर्चा न करता त्यांनी अर्ज माघार घेतला. त्यावर विचारले असता त्यांच्यावर लक्ष्मण हाकेंचा दबाव असल्याची माहिती दिली. नंतर तोच उमेदवार 7 नोव्हेंबर रोजी लक्ष्मण हाकेंच्या गाडीतून लोहा मतदारसंघात फिरत होता. 12 नोव्हेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी भोकरमध्ये सभा घेतली. त्यामध्ये आईलवाड हा स्टेजवर होता. नंतरच्या काळात तो सातत्याने लक्ष्मण हाकेसोबत दिसला. त्यामुळे लक्ष्मण हाकेंनी ओबीसी उमेदवार उभे करुन तोडपाणी केल्याचं स्पष्ट आहे. 

ही बातमी वाचा: 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
IPL 2026 All Teams Retained Players List: MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी

व्हिडीओ

Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला!
Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
IPL 2026 All Teams Retained Players List: MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
MI, CSK ते RCB, DC, PBKS पर्यंत..., कोणी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले?; 10 संघांची संपूर्ण यादी
Chandrapur Farmer: कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार
कर्ज फेडण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार
Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Embed widget