फक्त पोल्ट्रीच नाही, गावरान कोंबडीचा ब्रँड बनवला, केवळ अंडी विक्रीतून 50 हजाराचा नफा, अकोल्याच्या गजानन अंधारेंची यशोगाथा
Akola Success Story: शेती बेभरवशाची असल्यानं त्यांनी जोडधंदा म्हणून नोव्हेंबर 2022 मध्ये शेतात गावरान कोंबड्यांचा 'पोल्ट्री फार्म' उभारण्याचा निर्णय घेतलाय. यातून तो महिन्याला सध्या तो 50 हजारांचा निव्वळ नफा कमावत आहे.
![फक्त पोल्ट्रीच नाही, गावरान कोंबडीचा ब्रँड बनवला, केवळ अंडी विक्रीतून 50 हजाराचा नफा, अकोल्याच्या गजानन अंधारेंची यशोगाथा Akola News Village Life Eggs 50 thousand profit from selling eggs alone success story of Gajanan Andhare akola फक्त पोल्ट्रीच नाही, गावरान कोंबडीचा ब्रँड बनवला, केवळ अंडी विक्रीतून 50 हजाराचा नफा, अकोल्याच्या गजानन अंधारेंची यशोगाथा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/18/2cc9c68a0c434ef45c5b212253ba68a2169503620937489_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : शेतीला जोडधंद्याची जोड साथ मिळाली तर शेतकऱ्यांसमोरचं समस्यांचं दुष्टचक्र थांबू शकतंय. मात्र, दुर्दैवानं तसं होत नसल्यानं बळीराजा संकटांशी लढतोय. मात्र, अकोला (Akola News) जिल्ह्यातील शिर्ला अंधारे येथील गजानन अंधारे हा शेतकरी यशाचा नवा अध्याय लिहायला निघालाये. अन् ही यशोगाथा जन्माला येतीये 'पोल्ट्री फार्म'च्या माध्यमातून. गावरान कोंबडीच्या अंड्यांचा (Egg) स्वत:चा 'ब्रँड' विकसीत केलाय. यातून तो महिन्याला सध्या तो 50 हजारांचा निव्वळ नफा कमावत आहे.
गजानन अंधारे... शिक्षण, बी.एस.सी. बायोलॉजी... गाव, अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालूक्यातलं शिर्ला अंधारे.... गजानन यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर शेतीत. त्यात ते भाजीपाल्याचे पिक घेतात. मात्र, ही शेती बेभरवशाची असल्यानं त्यांनी जोडधंदा म्हणून नोव्हेंबर 2022 मध्ये शेतात गावरान कोंबड्यांचा 'पोल्ट्री फार्म' उभारण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्यांनी सुमारे एक हजार देशी पक्षी 28 हजार रूपयांमध्ये विकत आणले आहे.
अंधारे यांनी गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी देशी कोंबडीपासून गावरान अंडी उत्पादनाला सुरुवात केलीय. अंधारे यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी सुरुवातीला एक ते दीड लाख रुपये खर्च करुन शेतातील 20 गुंठ्यात टिनशेड उभे केलेय. यात एक हजार पिल्लांचे संगोपन सुरु केलेय. संगोपन करण्यासाठी त्यांना प्रति कोंबडीला 35 ते 40 रुपये खर्च आलाय.चार महिन्यांनंतर यातील पाचशे कोंबड्यांची विक्री केली. त्याला भाव देखील चांगला मिळाला असून लाख रुपयाचा नफा मिळाला. पुढे त्यांनी देशी कोंबडीच्या अंडीची अस्सल चव असलेल्या गावरान अंडी 'VLE' (Village Life Eggs) हा ब्रँड त्यांनी उदयास आणला आहे.
असा वाढवला व्यवसाय?
- गावरान अंडी 'पॅकिंग'साठी त्यांनी नागपूरहून पृष्ठाचे 'पॅकिंग बॉक्स' तयार करून घेतलेय. हळूहळू त्यांचा गावरान अंडी' विक्रीचा व्यवसाय विस्तारात गेलाय.
- आज पातुर, अकोला, वाडेगाव, बाळापुर, कापशी, चिखलगाव, पिंजर, बार्शीटाकळी सारख्या ठिकाणी अंडी विक्री होत आहेत.
- या देशी कोंबड्यांसाठी महिन्याला 25 ते 30 हजार रूपये खाद्य खर्च लागतो.
- अंधारे हे शेतात भाजीपाला पिके घेत असल्यामुळे वेस्टेज भाजीपाला ते कोंबड्यांच्या खाद्यासाठी वापरत आहे.
- गजानन यांच्या पत्नी प्राजक्ता हे त्यांच्या व्यवसायाला हातभार लावत आहेय. गावरान अंडी पॅकिंग करण्याचं काम त्या स्वतः पाहतात. त्यामुळे इथेही त्यांचा मजुरांचा खर्च वाचतोये.
या गावरान अंडी 'पॅकिंग बॉक्स'मध्ये सहा अंडी असतात. त्याची किंमत ठोक बाजारात 80 ते 90 रुपये आहेत. तर किरकोळ बाजारात 100 रुपये ते 108 रुपयापर्यंत विक्री होतायेत. 150 ते 160 दराप्रमाणे दररोज ही गावरान अंडी विकल्या जात असेल तर महिन्यासाठी 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत उलाढाल होतेये. यातून कोंबड्याचा संगोपनाचा खर्च वजा करता त्यांना निव्वळ नफा म्हणजे 40 ते 45 हजार रुपये हाती उरतायेत. 'जोडधंदा' हे शेती व्यवसायातील अनेक प्रश्नांवरचा रामबाण उपाय आहे. सरकार शेती आणि शेतकऱ्यांसाठी सरकारनं गांभीर्यानं 'जोडधंदा मॉडेल' उभं करण्यासाठी सातत्याने आणि गांभीर्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे.
हे ही वाचा :
Akola News: अकोटमध्ये शेतकऱ्यानं फुलवला पानांचा पानमळा, 20 गुंठ्यातून घेतले लाखोंचे उत्पादन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)