एक्स्प्लोर

Akola : हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा दणदणीत विजय

Akola Zilla Parishad पोटनिवडणुकीत वंचितचा दणदणीत विजय झाला आहे. हातरुण सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेकडून जागा हिसकावली. वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगोकार यांचा 1641 मतांनी विजय झाला.

Akola Hatrun ZP Bypoll : अकोल्यातील हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना जोरदार धक्का दिला. या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा 1601 मतांनी दणदणीत विजय झाला. वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगावकर यांनी शिवसेनेचे उमेदवार अश्विनी गवई यांचा पराभव केला. हा विजय मिळवून शिवसेनेची जागा हिसकावत जिल्हा परिषदेत वंचितची ताकद वाढली आहे. 

जिल्हा परिषदेतील सध्याचं पक्षीय बलाबल 
एकूण जागा : 53
वंचित बहुजन आघाडी : 23
शिवसेना : 12
भाजप : 05
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 04
प्रहार : 01
अपक्ष : 04

Akola : हातरुण जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा दणदणीत विजय

हातरुण सर्कलसाठी काल मतदान
अकोल्यात जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या हातरुण सर्कलसाठी काल (5 जून) मतदान झालं होतं. या पोटनिवडणुकीत सात उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते तर दोघांनी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगोकार, भाजपच्या राधिका पाटेकर, शिवसेनेच्या अश्विनी गवई, काँग्रेसच्या रसिका इंगळे यांच्यासह अपक्ष अनिता भटकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यात वंचितच्या लिना शेगोकार आणि शिवसेनेच्या अश्विनी गवई यांच्यात मुख्य लढत झाली आणि वंचितचा विजय झाला.

बालेकिल्ल्यात शिवसेनेचा मानहानीकारक पराभव
हातरुण सर्कलमध्ये शिवसेनेच्या सुनीता गोरे या निवडून आल्या होत्या. मात्र त्यांना अपात्र घोषित केल्याने येथे पोटनिवडणूक पार पडली. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले असून काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली आहे. दरम्यान शिवसेनाचा हां गड असलेला हातरुण जिल्हा परिषद गटावर वंचितने विजय मिळवला. दरम्यान ही निवडणूक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. कारण देशमुख हे बाळापूर मतदारसंघाचे आमदार असून त्यांच्या मतदारसंघातील हातरुण गटासाठी निवडणूक होती. आमदार देशमुख यांची जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती झाल्यावर पहिल्याच निवडणुकीत त्यांना मानहानीजनक पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.

हातरुणमध्ये पोटनिवडणूक का?
हातरुण सर्कलमधून शिवसेनेच्या सुनीता सुरेश गोरे विजयी झाल्या होत्या. मात्र उमेदवारी अर्ज सादर करताना सुनीता गोरे यांनी सोनाळा इथल्या मालमत्तेचा 2014-2019 पर्यंतच कर भरला नाही. मोरगाव भाकरे इथल्या शेतजमिनीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केलेला नाही, असा आरोप करत विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी गोरे यांना अपात्र घोषित केलं होतं. त्यामुळे इथे पोटनिवडणूक घेण्यात आली.

मागच्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक मतं
2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत मुख्य लढत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये झाली होती. त्यावेळी शिवसेना उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली होती. परंतु यावेळी वंचितने शिवसेनेला धक्का देत दणदणीत विजय साजरा केला. मागच्या वेळी चार प्रमुख पक्षांनी किती मतं मिळाली होती, हे जाणून घेऊया

शिवसेना - 3053
वंचित बहुजन आघाडी - 2956
भाजप - 2143
काँग्रेस - 2116

या पोटनिवडणुकीत उमेदवारनिहाय मिळालेली मतं 
 
      उमेदवाराचे नाव       मिळालेली मते     पक्ष
1. रशिका ब्रह्मदेव इंगळे        362             काँग्रेस
2. अश्विनी अजाबराव गवई    2660            शिवसेना
3. राधिका संदीप पाटेकर      2091            भाजप
4. अनिता रविंद्र भटकर            39             अपक्ष
5. लिना सुभाष शेगोकार        4301         वंचित (विजयी)
 
जिल्हा परिषदेच्या संख्याबळात वंचितची ताकद वाढली
अकोला जिल्हा परिषदेत एकूण 53 सदस्य आहेत. सध्या सत्तेत असलेली वंचित जिल्हा परिषदेच्या संख्याबळात अल्पमतात आहे. वंचितचं स्वत:च्या 23 सदस्यांसह दोन सहयोगी अपक्षांसह 25 संख्याबळ आहे. 2020 मध्ये झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजप अनुपस्थित राहिल्यामुळे वंचितची सत्ता जिल्हा परिषदेत आली होती. मात्र, अलिकडे पाच महिन्यांपूर्वी दोन सभापतीपदांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार आणि दोन अपक्ष एकत्र येत वंचितचा पराभव केला होता. या पराभवामुळे वंचितचं संख्याबळ एकने वाढल्याने 25 झालं आहे. तर विरोधकांकडे 28 सदस्य आहेत. पुढच्या महिन्यात होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापती पदाच्या निवडणुकीत वंचितची ताकद वाढली आहे. पाच सदस्य असलेल्या भाजपच्या पवित्र्यावर पुढच्या महिन्यातील सत्तेचं समीकरण अवलंबून आहे. 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025Sandeep Kshirsagar Dharashiv Speech : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीVasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Embed widget