19 वर्षे देशसेवा, अहिल्यानगरमधील माजी सैनिक 10 वी परीक्षा पास, मुलगाही उत्तीर्ण; निकालाचा डबल आनंद
अहिल्यानगर येथील रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या शाळेतील शिक्षक व प्राचार्य सुनील सुसरे यांच्याकडून अभिनंदन व कौतुक केलं जात आहे.

अहिल्यानगर : राज्यात दहावी बोर्ड परीक्षाचा निकाल (SSC Results) जाहीर आज दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये, कोकण विभागाने 98.8 टक्के निकाल घेत राज्यात बाजी मारली. महाराष्ट्रातील एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 94.10 लागला आहे. विशेष म्हणजे अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील भाई सथ्था नाईट स्कूल या रात्र शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील या परीक्षेता चांगले यश मिळवलं आहे. येथील रात्र शाळेमध्ये (School) दहावीचे शिक्षण घेणारे माजी सैनिक अंकुश पानंमद आणि वडापाव विक्रेत्या मंगल रांधवन हे दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. अंकुश पानमंद यांनी 19 वर्षे देश सेवा केली असून सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अपूर्ण राहिलेले शिक्षण घेण्यासाठी त्यांनी रात्र शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि ते यावर्षी दहावी उत्तीर्ण झाले. अंकुश यांना दहावीमध्ये 60% गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा साहिल पानमंद हा देखील दहावीला होता, त्याला देखील 74 टक्के गुण मिळाले आहेत. दहावीच्या परीक्षेत एकाचवेळी बाप-लेक उत्तीर्ण झाल्याने पानमंद कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
अहिल्यानगर येथील रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या शाळेतील शिक्षक व प्राचार्य सुनील सुसरे यांच्याकडून अभिनंदन व कौतुक केलं जात आहे. विशेष म्हणजे येथील रात्र शाळेत शिकणाऱ्या एका वडापाव विक्रेत्या महिलेनंही यंदा दहावीची परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवले. तर, माजी सैनिक असलेल्या अंकशु पानमंद यांनी आपल्या मुलासह यंदा 10 वीच परीक्षा दिली होती. त्यामध्ये, बाप-लेक दोघेही एकाचवेळी दहावी उत्तीर्ण झाले आहेत. दुसरीकडे रात्र शाळेत शिकणाऱ्या वडापाव विक्रेत्या मंगल रांधवन या देखील उत्तीर्ण झाल्या असून 1994 साली लग्न झाल्यानंतर संसाराचा गाडा हाकताना त्यांचे शिक्षण मागे पडले होते. परंतु कुठेतरी दहावी पास होण्याची आणि शिकण्याची जिद्द असल्याने 32 वर्षानंतर त्यांनी दहावीमध्ये प्रवेश घेतला आणि त्या देखील आज दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. मंगल रांधवन यां 47 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाल्या असून या पुढील शिक्षण देखील करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवलं. मंगल यांच्या या जिद्दीला आणि शैक्षणिक यशस्वीतेला कौतुकाची थाप मिळत असून स्थानिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
राज्यातील 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
राज्यात 12 वीनंतर आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Results) आज जाहीर झाला. राज्यात यंदा दहावीचा निकाल 94.10 % लागला असून कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.82 टक्के असून नागपूर विभागात सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे. लातूर (Latur) पॅटर्नचा यंदाही म्हणावा तेवढा निकाल दिसला नाही. कारण, राज्यातील 9 विभागांपैकी लातूर विभागाचा निकाल यंदा शेवटून दुसऱ्या क्रमांवर असून 92.77 टक्के एवढा आहे. मात्र, लातूरमधील 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवल्याने पुन्हा एकदा लातूर पॅटर्नची चर्चा होताना दिसून येईल. राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले असून लातूरमधील 113 विद्यार्थ्यांनी (Student) 100 टक्के गुण मिळवत देदीप्यमान कामगिरी बजावल्याचं दिसून येतं. दरम्यान, लातूर विभागात धाराशिव जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आह.
हेही वाचा
दहावीच्या निकालाचा लातूर पॅटर्न; विभागात 113 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, मुलींनी मारली बाजी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























