एक्स्प्लोर

'आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतंय, अशी स्थिती', राधाकृष्ण विखेंचा शरद पवारांना टोला

Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar : 'आज नातवाकडे पाहूनच पुढे जावं लागतं आणि शिकावं लागतं अशी स्थिती आहे, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

अहमदनगर : शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. 'आज नातवाकडे पाहूनच पुढे जावं लागतं आणि शिकावं लागतं अशी स्थिती आहे', असा टोला राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना नाव न घेता लगावला आहे. लोणी येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

आज राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साखर कारखाना कार्यस्थळावर गणपती बाप्पाचे (Ganpati Bappa) विधिवत पूजन करत स्थापना केली. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना गणेश स्थापनेला यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहे. दरवर्षी निवासस्थानी गणेश पूजा न करता कारखाना कार्यस्थळावरच विखे परिवार गणेशाची स्थापना करतात. महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासह पत्नी शालिनी विखे यावेळी उपस्थित होत्या. तर यावर्षी राधाकृष्ण विखेंचा तीन वर्षीय नातू अभिमन्यू (सुजय विखे यांचा मुलगा) देखील गणेश स्थापनेच्या (Ganeshotsav) पूजेत सहभागी झाला होता. 

आज नातवाकडे पाहूनच पुढे जावं लागतं

यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले की, गणरायाच्या आगमनाआधी राज्यातील सर्व धरणे भरली, हा खरा आनंद आहे. आज शेतकरी सुखावला आहे. काही भागात दुर्दैवानं अतिवृष्टीचा संकट उद्भवलं. मात्र, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचा संकल्प आम्ही हाती घेतला आहे. हा विकास करण्यासाठी गणरायाने शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केली. नातू अभिमन्यू याच्याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखेंनी आज नातवाकडे पाहूनच पुढे जावं लागतं आणि शिकावं लागतं अशी स्थिती असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला आहे. 

व्यक्ती द्वेषातून फडणवीसांवर टीका : राधाकृष्ण विखे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक चक्रव्यूह करुन माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्युहात कसं शिरायचं हे मला माहित आहे आणि बाहेर कसं यायचं आहे हे पण मला माहीत आहे, असे वक्तव्य केले. याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, कार्यकुशल आणि समृद्ध, असे फडणवीसांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना अनेक विकासकामे केली. अनेक वर्ष सत्ता भोगलेल्यांना आपण काही करू शकलो नाही याच शल्य आहे. त्यामुळे व्यक्ती द्वेषातून फडणवीस यांच्यावर टीका केली जाते. त्यांच्यावर टीका केल्यानं त्यांचे महत्त्व आणि त्यांचं काम कमी होणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

आणखी वाचा 

Pune News : पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोर राडा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in IndiaSpecial Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यSpecial Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?ABP Majha Headlines : 11 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Embed widget