एक्स्प्लोर

Sujay Vikhe : 'सुजयपर्व' नावाने मोक्का आरोपीने उघडलं संपर्क कार्यालय; सुजय विखे पाटलांचा थेट इशारा; म्हणाले...

Sujay Vikhe Patil : शिर्डी जवळील निमगाव हद्दीत मोक्काच्या आरोपीने सुजय विखे पाटील यांच्या नावे संपर्क कार्यालय उघडले होते. यावरून आता सुजय विखेंनी इशारा दिला आहे.

Sujay Vikhe Patil : शिर्डी (Shirdi) जवळील निमगाव हद्दीत मोक्काच्या (Mcoca Act) आरोपीने सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या नावे संपर्क कार्यालय उघडले होते. यावरून विरोधकांनी सुजय विखे पाटलांवर निशाणा साधला होता. आता यावर सुजय विखेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या नावाचा गैरवापर होत असेल तर कारवाई करणार, असे त्यांनी म्हटले आहे. 

शिर्डी विधानसभा मतदारसंघात (Shirdi Vidhan Sabha Constituency) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे आमदार असून विखे पाटील यांचे मतदारसंघावर वर्चस्व आहे. महिन्याभरापूर्वी शिर्डी जवळील निमगाव हद्दीत दीपक पोकळे (Deepak Pokale) आणि सागर पगारे (Sagar Pagare) या दोघांनी सुजयपर्व या नावाने संपर्क कार्यालय सुरू केलं. मात्र यातील दीपक पोकळे हा मोक्कातील आरोपी असल्याच आता समोर आले आहे. राहाता मतदार संघातील भाजपचे नेते व विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक राजेंद्र पिपाडा (Rajendra Pipada) यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती समोर आणली. 

सुजयपर्व नावाने सुरु केले होते संपर्क कार्यालय

महिनाभरापूर्वी या कार्यालयाचे उद्घाटन देखील सुजय विखे यांनी केलं होते. या सोहळ्याला मोक्कातील आरोपी दीपक पोकळे हजर नसला तरी त्याचे फोटो असलेले फ्लेक्स परिसरात लागलेले होते. दीपक पोकळे याच्यावर राहता पोलीस ठाण्यात हत्या, गोळीबार आणि लूटमारीचे विविध गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर जेल बाहेर असून जेलमधून सुटल्यानंतर त्याने आपल्या मित्राच्या साथीने सुजयपर्व या नावाने संपर्क कार्यालय सुरू केलं. मात्र या संदर्भात सुजय विखे यांना विचारले असता त्यांनी माझ्या नावाचा जर असा कोणी गैरवापर करत असेल तर त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील? 

सुजय विखे पाटील म्हणाले की, आमच्या ऑफिसमध्ये अनेक जण येतात. मात्र त्यातील कोण गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे हे आम्हाला माहीत नसतं. कोण कुठल्या जाती-धर्माचा हे सुद्धा आम्ही कधी पाहत नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले कुठलेही लोक आमच्या यंत्रणेत आम्ही कधीही वापरले नाही. यापुढे देखील तसं होणार नाही. आमच्या निदर्शनास अशी बाब आल्यावर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

मोठी बातमी : सुजय विखेंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला; संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरूद्ध सुजय विखे लढत?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 25 March 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 25 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित, नेमकं काय झालं?
Nashik FDA Raid : नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
नाशिकमध्ये FDA अ‍ॅक्शन मोडवर, शेकडो किलो बनावट पनीर केलं नष्ट, गुढीपाडवा, रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
तमीम इक्बालला हृदयविकाराचे 2 धक्के, पहिला सौम्य, दुसरा तीव्र, 22 मिनिटे CPR, दोनवेळा शॉक ट्रीटमेंट, प्रकृती कशी?
Aurangzeb & Sambhaji Maharaj: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यावर पंडितांनी मनुस्मृतीची पद्धत वापरायला सांगितली; काँग्रेसच्या हुसेन दलवाईंचं वक्तव्य
औरंगजेबाने संभाजी महाराजांना मनस्मृतीप्रमाणे मारलं, पंडितांनी पद्धत सांगितली: हुसेन दलवाई
Ambadas Danve : अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
अंबादास दानवेंनी पेनड्राईव्ह आणला, पाकिस्तानी बॉण्ड दाखवले, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL मध्ये बेटिंग, मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
जयकुमार गोरेंवर आणखी एक गंभीर आरोप, मेलेल्या पिराजी भिसेंना 'जिवंत' करून कॉलेजच्या रस्त्याची जमीन हडपली
Solapur Crime: बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
बार्शी हादरली! मानलेला भाऊ वैरी झाला, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने शरीराचे लचके तोडले
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचं निधन; 49 वर्षी अखेरचा श्वास, लीड अॅक्ट्रेसचे डॉक्टरांवर गंभीर आरोप
Embed widget