एक्स्प्लोर

Sangamner Farming Story : कौतुकास्पद! शेतकरी बापाला तरुणीचा हातभार, संगमनेरची वंदनाने फुलवली 20 एकर शेती

Sangamner Farming Story : संगमनेरच्या वंदना शेळकेने तब्बल वीस एकर शेती सांभाळून दूध व्यवसाय करत नवा आदर्श उभा केला आहे. 

Sangamner Farming Story : एकीकडे शेतकरी नवरा नको ग बाई' अशी एक आवई समाजात मुलींबद्दल उठवली जात आहे. उच्च शिक्षित तरुणी शेतकरी मुळाशी लग्न करण्यास नकार देत आहेत. मात्र आजही अनेक उदाहरणे आहेत कि ज्या मुलींनी उच्च शिक्षण घेऊन शेतीत नवे प्रयोग करण्याचे धाडस केले आहे. असंच एक उदाहरण संगमनेर (Sangamner) तालुक्यात पाहायला मिळालं आहे. येथील शेळकेवाडीची वंदना शेळके तब्बल वीस एकर शेती सांभाळून दूध व्यवसाय करत आहे. तिने नवा आदर्श उभा केला आहे. 

ही गोष्ट आहे अहमदनगर (Ahamdnagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अकलापूरच्या वंदनाची (Vandana Shelke). येथूनच जवळच शेळकेवाडी येथील लिंबाजी शेळके यांची वंदना ही मुलगी. वंदना बी. फार्मसीच्या (B Pharmacy) तिसऱ्या वर्षात शिकत असून मात्र एखाद्या तरुणाला लाजवेल अशी शेती उभारली आहे. शेळकेवाडीत शेळके कुटुंबीयांची जवळपास 20 एकर बागायती शेती असून ती स्वतः सांभाळत आहे. यासाठी तिला कुटुंबियांची मोठी मदत होते. एकीकडे अनेक तरुणी चांगले शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावताना पाहायला मिळते. परंतु वंदनाने याला छेद देत बी. फार्मसीचे शिक्षण सुरू असतानाही आधुनिक पद्धतीने शेती करत तिची ही जिद्द व परिश्रम पाहून कुटुंबीय देखील तिच्या खांद्याला खांदा लावून मदत करत आहे.

वंदनाचे वडील म्हणतात कि, वंदना व ऋतृजा अशा दोन मुली आहेत. मुलगा नसल्याने शेती करण्यासाठी कोणीच नव्हते. मात्र आज माझ्या दोन्ही मुली मुलाप्रमाणेच शेती करत आहे. वंदना बी. फार्मसी करत असून, तिला ट्रॅक्टर चालविण्याचा छंद होता म्हणून ट्रॅक्टर घेऊन दिला. त्यामुळे ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची सर्व कामे करत आहे. दोन्ही मुलींनी आजपर्यंत मुलाची ऊणीव भासून दिली नाही. त्यामुळे माझ्या वंशाचा दिवा या दोन्ही मुलीच आहेत.

घरात लहानपणा पासून शेती पाहत आलेय त्यामुळे आवड निर्माण झाली..आज मजूर मिळत नाही.. त्यामुळे सगळी काम शेतकऱ्याला करावी लागतात.. शेतकऱ्याच्या मुलींनी शेती केली पाहिजे.. शेतकरी मुलगा नको म्हणणाऱ्या मुलींनी सुद्धा शेती केली पाहिजे. वडील लहानपणापासूनसोबत ठेवायचे. शेतीची कामे त्यांनी समजून सांगितली. आज शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे, सरकारने शेती मालाला हमीभाव दिला पाहिजे, अस माझं मत असून शेती करणाऱ्या भविष्य मोठं आहे, अस मत वंदनाने व्यक्त केल आहे. 

खरं तर 'आज शेतकरी नवरा नको ग बाई' अशी अवस्था सध्या समाजात दिसून येत आहे. अनेक मुली शेतकरी मुलगा असल्याने नाकारल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र आज वंदनाने शेतीत ज्या पद्धतीने स्वतःला झोकून देऊन काम करते आहे, त्यावरून इतरांसाठी ती आदर्श ठरली आहे. अलिकडे शेती व्यवसाय झाल्याने त्यात आधुनिकता वाढली आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा वापर, तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन आणि नवीन प्रयोग वंदना करत आहे. नांगरणी, रोटा मारणे, फवारणी, पाणी भरणे, दूध काढणे आदी कामे ती करते. आपली मोठी बहीण अगदी जीव ओतून शेतीत रमते हे पाहून छोटी बहीण ऋतुजा देखील तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मदत करते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याDatta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
Embed widget