एक्स्प्लोर

जयश्री थोरात यांचं ठिय्या आंदोलन अखेर मागे; आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांना 24 तासांचा दिला अल्टीमेटम

Sujay Vikhe Patil vs Jayshree Thorat : सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी 12 तास ठिय्या मांडला.

संगमनेर : भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये (Sangamner) मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला. आता पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. 

जयश्री थोरातांचा इशारा

पोलिसांना 24 तासाची मुदत देत आहोत. 24 तासात संशयित आरोपीला अटक झाली पाहिजे अन्यथा पुन्हा ठिया आंदोलन करणार असा इशारा जयश्री थोरात यांनी दिला आहे. तर वसंतराव देशमुख यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे. पोलिसांच्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही. माझ्यासारख्या महिलेला 8 तास गुन्हा दाखल करण्यासाठी बसवले, तर इतरांचे काय? पोलिसांना काम करण्यासाठी अवधी देत आहे. आम्ही समाधानी नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

अजित पवारांकडून सुजय विखेंची कानउघडणी

दरम्यान, सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुजय विखे यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार यांनी सुजय विखे यांची या वक्तव्या प्रकरणी कानउघडणी केल्याचे समजते. महायुतीला अडचणी निर्माण होतील असं कुठंलही वक्तव्य न करण्याची सूचना देखील अजित पवार यांनी सुजय विखेंना केली आहे. 

काय म्हणाले सुजय विखे पाटील? 

या प्रकरणावर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, सभेतील झालेलं महिलांचे वक्तव्य निषेधार्थ आहे. महायुतीच्या वतीने कालही निषेध केला व आजही करतो. वसंतराव देशमुख महायुतीचे घटक नाहीत. केवळ त्या गावातील ज्येष्ठ व थोरात विरोधक म्हणून स्टेजवर आले होते. त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं ते स्वतःहून भाषणाला उठले. भाषण करताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही. अशा प्रकारच्या खालच्या पातळीचे टीका महायुती स्वीकार करत नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर कारवाई करा असं देखील आम्ही पोलिसांना सांगितलं. मात्र हे सगळं घडल्यानंतर ज्याने वक्तव्य केलं तो बाजूला राहिला आणि पुढच्या पंधरा मिनिटात त्या गावच्या एक्झिट पोइंटवर प्रत्येक ठिकाणी शंभर ते दीडशे जणांचा जमाव आला. गाड्या थांबवल्या गेल्या, दगड घेऊन गाड्या फोडल्या. आज सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर हा मला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता हे समोर आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

आणखी वाचा 

'सुजय मेलेल्या आईचा दूध प्यायलेला नाही, जशास तसे उत्तर देईल'; शालिनीताई विखे पाटील आक्रमक, Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget