एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'आधी आमदारकीचा राजीनामा द्या, मगच भाजपचा प्रचार करा'; महाजनांची खडसेंवर बोचरी टीका, ठाकरे-राऊतांनाही डिवचलं!

Girish Mahajan : एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. खडसे यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी भाजपचे काम करावे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Girish Mahajan शिर्डी : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये (BJP) घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजून त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा प्रचार रावेर लोकसभा मतदारसंघात सुरु केला आहे. यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. तसेच ग्रीष महाजन यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही टीका केलीय. 

गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. खडसे यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतर त्यांनी भाजपचे काम करावे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतोय. कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपचा आहे. 

खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची 

विधानसभेला मुलगी तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे, असे त्यांचे सुरु आहे. त्यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, त्यामुळे त्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे. 

मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचंय

महायुती जागावाटपाबाबत विचाले असता गिरीश महाजन म्हणाले की, महायुतीचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यासाठी उशीर झाला आहे. मात्र नाशिक, ठाणे या सर्व जागा महायुतीच जिंकणार आहे. मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचंय हे लोकांनी ठरवलंय, असे त्यांनी म्हटलंय. 

स्नेहलता कोल्हे नाराज नाहीत 

अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) या विखे पाटलांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी स्नेहलता कोल्हे यांची भेट घेतली. यावर गिरीश महाजन म्हणाले की, स्नेहलता कोल्हे यांच्याशी सतत संपर्क सुरु आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हेंशी बोलले आहेत. काही गोष्टी असतात, मात्र त्या नाराज नाहीत. चर्चेअंती सर्व नाराजी दूर झालीय. कोपरगाव मतदारसंघातून चांगलं मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळेल, असा विश्वास गिरीश महाजनांनी यावेळी व्यक्त केलाय. 

उध्दव ठाकरेंनी केलेली चूक अक्षम्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे काही माझे शत्रू नाहीत असे म्हटले. यावर गिरीश महाजन म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ऋणानूबंध होते. आम्ही सन्मानाने मातोश्रीवर जायचो. आता उध्दव ठाकरेंना दररोज तीन ठिकाणी फिरावे लागते. कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसच्या ऑफिसला जावे लागते. उद्या प्रकाश आंबेडकरांनी बोलावले तर त्यांच्याही ऑफिसला जावे लागेल. उध्दव ठाकरेंनी इतकी वाईट स्थिती स्वतःवर  ओढावून घेतली आहे. मोदीजी राजकीय नाही तर वैयक्तिक कामात ठाकरे कुटुंबाला मदत करतील. मात्र उध्दव ठाकरेंनी केलेली चूक अक्षम्य आहे. त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसणारच आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 

गिरीश महाजनांची संजय राऊतांवर बोचरी टीका 

मोदींनी खिडकी काय दरवाजा उघडला तरी काही फरक पडणार नाही, आम्ही समोर उभ राहणार, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. यावर गिरीश महाजन म्हणाले की, आमच्या खिडक्या, दरवाजे तुमच्यासाठी उघडे नाहीत. तुम्हाला लोकांनीच बाहेर हाकलले आहे. आज तुमचं अस्तित्व काय? या बहादरामुळे शिवसेना गेली. आमच्याबरोबर निवडून आलात आणि गद्दारी केली. मोदींच्या सभेमुळे तुमच्या जागा निवडून आल्या. निवडून आल्यावर इतक्या वर्षांच्या संबंधांना तिलांजली दिली. आता काँग्रेससाठी मतदान मागताय. तुमची विश्वासार्हता आणि हिंदुत्व संपलंय, अशी टीका त्यांनी यावेळी संजय राऊतांवर केली आहे. 

आणखी वाचा 

Eknath Khadse : नाथाभाऊ सुनबाईसाठी मैदानात, भाजप प्रवेशाआधीच रक्षा खडसेंच्या प्रचाराला सुरुवात!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Conflict: सत्तास्थापनेचा महातिढा; महाराष्ट्रातील रखडलेले प्रश्नChandrashekhar Bawankule : निकालावर प्रश्नचिन्ह उभं करणं म्हणजे जनतेचा अपमान - बावनकुळेEknath Shinde - Devendra Fadnavis : फडणवीसांच्या गळ्यात माळ; एकनाथ शिंदे नाराज?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :27  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार? VIDEO
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
Embed widget