एक्स्प्लोर

Ahmednagar : बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसाचा केक सत्यजित तांबेंनी कापला

Latest News update : माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आज संगमनेर तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला.

Ahmednagar Shirdi Latest News update : माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आज संगमनेर तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला. वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या उपस्थितीत काल्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात उपस्थित होत्या. त्यांनीनी इंदुरीकर महाराज यांच्या उपस्थितीत बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचा केक कापत आनंद उत्सव साजरा केला. संगमनेरमध्ये सध्या याची चर्चा सुरु आहे.  बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कर्यक्रमात आज सत्यजित व जयश्री यांच्या भाषणाची चर्चा रंगली होती.     

संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात आज बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेब थोरात आजारी असल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे, जयश्री थोरात यांनी या कीर्तन सोहळ्यात हजेरी लावत वाढदिवस साजरा केला. बाळासाहेब थोरात यांनी थेट मुंबईहून व्हिडिओ संदेश पाठवत सर्वांचे आभार मानले. 

जयश्री थोरात काय म्हणाल्या?
काल्याच्या कीर्तनानंतर इंदुरीकर महाराज यांना सत्कारासाठी बोलावले असता त्यांनी मी घरचाच आहे, आधी नवीन आमदारांचा सत्कार कसा करा असं सांगितलं. त्यानंतर सत्यजित तांबे यांचा सत्कार केला. सत्कारानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी उपस्थिंताशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की,  मी गेल्या अनेक महिन्यात इतक्या सप्ताहांमध्ये भाषण केली की आता साहेबांना ही काळजी वाटायला लागली माझी पोरगी प्रवचनकार होते की काय. जयश्री यांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा उडाला होता. तर यावेळी जयश्री थोरात यांनी महिलांना कॅन्सर पासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं…

सत्यजित तांबे काय म्हणाले?
एकवेळ अशी होती की राजकारणातील नेते मंडळी दिशा ठरवायचे आणि लोक त्यांचे बघून पुढचं काम करायचे. मात्र आता जमाना बदललाय. लोकांना जे आवडतं ते नेत्यांना करावं लागतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं वक्तव्य सत्यजित तांबे यांनी यावेळी व्यक्त केलं. जयश्रीने भाषणात सांगितलं की तिला कीर्तन करायला आवडायला लागलंय, मात्र इंदोरीकर महाराजांकडे पाहून अनेक कीर्तनकार तयार झालेत. इंदुरीकर महाराज उच्चशिक्षित असून उद्या परदेशात गेले तर इंग्रजीतूनही प्रवचन देतील.. असे गौरवोद्गार सत्यजित तांबे यांनी काढले.
               

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget