एक्स्प्लोर

Ahmednagar: संगमनेरमधील हिंदू संघटनांच्या 'भगवा' मोर्चाला मोठा प्रतिसाद; मात्र मोर्चानंतर झालेल्या दगडफेकीने गालबोट!

Sangamner Stone Pelting: संगमनेरमधील भगवा मोर्चानंतर दोन गटांत तुफान दगडफेक झाली. समनापूपमधील झालेल्या राड्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Sangamner Hindu Morcha: हिंदू समाजावर होणारे अत्याचार, लव्ह जिहाद (Love Jihad) आणि मारहाणीच्या घटनेविरोधात मंगळवारी (6 जून) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भगव्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. संगमनेर शहरात शांततेने हा मोर्चा पार पडला, परंतु मोर्चातून परतताना संगमनेर शहराजवळील समनापूर गावात दोन गटात दगडफेकीची घटना घडली. दगडफेकीमुळे काही काळी तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

समनापूर गावात झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं नुकसान झालं असून दोन जण जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे गावातील महिला आणि लहान मुलं घाबरुन गेले होते. दोन गटात हा राडा झाला असून सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून गावात शांततापूर्ण वातावरण आहे.

संगमनेर शहरात हिंदू संघटनांनी काढलेल्या भव्य जन आक्रोश मोर्चात तालुक्यातील नागरिकांनी आपले व्यवसाय 100 टक्के बंद ठेवला होता. हजारो मोर्चेकरी संगमनेरमधून काढण्यात आलेल्या भगव्या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे मोर्चाला महिला आणि युवतींची उपस्थिती देखील लक्षणीय होती. शांततेत मोर्चा संपन्न झाला खरा, मात्र मोर्चा संपल्यावर माघारी परतणाऱ्या मोर्चेकरी आणि एका गटात समानापूर गावात दगडफेक (Samnapur Stone Pelting) झाली आणि मोर्चाला गालबोट लागलं. 

घटनेचं गांभीर्य लक्षात घेता समनापूर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून दोषींवर कारवाई करणार असल्याचं सांगत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन गावकऱ्यांना केलं आहे.

दरम्यान, संगमनेर शहरातून मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यावर सभा घेण्यात आली होती, यावेळी लव्ह जिहाद, हिंदू समाजावर वाढलेले अत्याचार आणि मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यात आला. मोर्चा पूर्वी भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकार असताना पोलिसांवर दबाव असल्याने कारवाई होत नव्हती आणि त्यामुळेच अत्याचाराच्या छोट्या घटना वाढत गेल्याचं सुजय विखे पाटलांनी आरोप केला. राज्यात, मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर हिंदू समाजावरील अत्याचार, लव जिहाद आदी मुद्यांवर हिंदुत्ववादी संघटनांनीकडून राज्यात मोर्चे काढण्यात आले आहेत. काही ठिकाणी मोर्चातील भाषणांवरून पोलिसांनी गुन्हेदेखील दाखल केले आहेत. 

हेही वाचा:

Latur Crime : आईला मारहाण करणाऱ्या बापाचा 23 वर्षीय मुलाने केला खून, लातूरच्या रेणुकानगरातील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget