एक्स्प्लोर

Heramb Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला, रस्त्यात अडवून अज्ञाताकडून लोखंडी रॉडनं मारहाण 

Ahmednagar News : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अहमदनगर शहरात शिक्षक म्ह्णून कार्यरत असलेले कुलकर्णी आजारी असल्याने शाळेतून घरी येत असताना अज्ञातांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली. मारहाणीच्या 48 तासानंतरही पोलिसांनी कोणालाही अटक केली नसल्याचा आरोप हेरंब कुलकर्णीं यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी (Pratima Kulkarni) यांनी केला. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांनी घटनेची माहिती दिली आहे. 

हेरंब कुलकर्णी हे नावाजलेले मराठी लेखक असून ते सध्या अहमदनगर (Ahmednagar) शहरातील एका शाळेत कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी 12.18 वाजण्याच्या सुमारास शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आजारी असल्याने सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवरून घरी जाताना अहमदनगर शहरातील रासने नगरमध्ये जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. अज्ञातांनी मारहाण करत घटनस्थळावरून पळ काढला. याबाबत हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी शहरातील तोफखाना पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांचा (Ahmednagar Police) तपास सुरु आहे, मात्र 48 तास उलटून गेल्यानंतरही संशयितांचा तपास लागत नसल्याचा आरोप प्रतिमा कुलकर्णी यांनी केला आहे. 

हल्लेखोरांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला 4 टाके पडले असून डोक्यावरचा दुसरा फटका सुनील कुलकर्णी यांनी हाताने अडवला, त्यामुळे ते बचावले. अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यांना तत्काळ सिव्हील हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला आहे. 

फेसबुक पोस्टद्वारे हल्ल्याची माहिती 

दरम्यान या सर्व प्रकरणी हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत या घटनेला वाचा फोडली. 'शनिवारी ही घटना घडली. शाळेतून येत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली पण 48 तास उलटूनही अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. त्याचबरोबर अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे. सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉडने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे. आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे, असे त्यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

G20 Summit 2023: 'तुम्ही या देशातील गरिबांचे प्रतिनिधी आहात हे विसरू नका', हेरंब कुलकर्णी यांची पोस्ट चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसानUddhav Thackeray On Devendra Fadanvis : आम्ही देशभक्त, मोदीभक्त नाही; फडणवीसांना ठाकरेंचं उत्तरTushar Gandhi : कट्टरवादी हिंदुत्वामार्फत लोकांमध्ये भेदभाव, तुषार गांधींची भाजपवर टीकाUddhav Thackeray Kalachowki Full Speech : शेवटची सभा, शेवटचं भाषण, काळाचौकीत ठाकरेंचा निर्धार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश,
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
शेकडो IPS, हजारो PSI, 22,000 पोलीस, मुंबईत सुरक्षित मतदानासाठी कंबर कसली; बंदोबस्तात वाढ
Embed widget