एक्स्प्लोर

Rohit Pawar : तब्बल 800 किलोमीटर, 45 दिवसाचा प्रवास, 13 जिल्हे, दररोज 25 किमीचा प्रवास, अशी असणार युवा संघर्ष यात्रा!

Ahmednagar News : आमदार रोहित पवार येत्या 24 ऑक्टोबरपासून 820 किलोमीटरची युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. तब्बल 13 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे.

अहमदनगर : एकीकडे आगामी निवडणुकांचा दृष्टीने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असून राजकीय पक्षाकडून दौरे, पदयात्रा सुरु आहेत. यंदाच्या निवडणुकांत युवांचा आवाज घुमणार असल्याने आमदार रोहित पवार यांनी युवकांच्या प्रश्नांना हात घालत तब्बल 800 किलोमीटरचं युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटी आदीसंह विविध प्रश्नांवर या यात्रदरम्यान विचारमंथन करण्यात येणार आहे. 

आमदार रोहित पवार येत्या 24 ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. ही यात्रा 800 किलोमीटरची पदयात्रा असून तब्बल 13 जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातून युवा संघर्ष यात्रेला सुरवात होणार असून 45 दिवसांचा प्रवास करून 7 डिसेंबर रोजी नागपूरला याची सांगता होईल. पुण्यातील महात्मा फुले वाडा येथून या यात्रेला सुरवात होणार आहे. त्यांनतर वढू तुळापूर येथे नतमस्तक होऊन, यात्रेचा शुभारंभ होईल. संतांच्या, महाराजांच्या भूमीतून यात्रा जाणार असून दररोज कमीत कमी 16 आणि जास्तीत जास्त 25 किमी असा पायी प्रवास असणार आहे. या पदयात्रेचा एक भाग म्हणून, आमदार रोहित पवार इतर असंख्य युवांसोबत पुणे ते नागपूर अशी पदयात्रा करतील आणि राज्यातील तरुण-तरुणींना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी जनतेशी संवाद साधतील. संपूर्ण पदयात्रेदरम्यान, युवांना त्यांची मतं आणि अपेक्षा व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले की, ‘युवा संघर्ष यात्रा’ ही युवांच्या नेतृत्वाखालील एक चळवळ आहे, ज्याचा मूळ उद्देश महाराष्ट्रातील युवांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जनसमर्थन एकत्रित करणे आणि युवा वर्गाचा आवाज शासनापर्यंत पोहचवणे हा आहे. आज युवा म्हणून संवाद साधत आहे. ज्या दिवसापासून राजकारणात आलो, तेंव्हापासून युवांचे प्रश्न मांडणे अन त्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करत आलो आहे. मतदारसंघाप्रमाणेच युवांच्या प्रश्नांना ही प्राधान्य मांडले आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटी, शाळा दत्तक देण्याचा निर्णय आदी प्रश्नावर आवाज उठवला जाणार आहे. त्याचबरोबर आजच्या राजकारणाची परिस्थिती पाहता युवा नेत्यांनी राजकारणात आलो ही चूक झाली का? किंवा नव्या पिढीने राजकारणात यावं की नाही?  असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

असा असणार युवा संघर्ष यात्रेचा प्रवास 

राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून युवा संघर्ष यात्रेला येत्या 24 ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे पुण्यातून या यात्रेला सुरुवात होईल पुणे ते नागपूर असा हा 800 किलोमीटरचा प्रवास असणार आहे एकूण 45 दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.

इतर महत्वाची बातमी : 

Rohit Pawar : टोलवरुन प्रश्न विचारणाऱ्या मराठी अभिनेत्रीचे सोशल अकाऊंट्स टार्गेट, ट्रोल गँग वापरुन किती खालची पातळी गाठणार, रोहित पवार आक्रमक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget