(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar: रोहित पवार हे महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहतायेत का? तरुणाईचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रोहित पवार पुन्हा मैदानात
देशात सध्या अनेक नेते पायी यात्रा (Rohit Pawar) काढताना दिसत आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर आता राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे.
पुणे : देशात सध्या अनेक नेते पायी यात्रा (Rohit Pawar) काढताना दिसत आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर आता राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ही यात्रा असणार आहे. या यात्रेमार्फत ते राज्याचे राहुल गांधी बनू पाहत आहेत का ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कशी असेल यात्रा?
या यात्रेबाबत बोलताना ते म्हणाले की, पत्नी आणि मुलांशी पुन्हा बोललो. त्यानंतर 'युवा संघर्ष यात्रा' यात्रा काढण्याचे ठरवले. 820 किलोमीटरची पदयात्रा काढायचं ठरलं. दसऱ्याच्या दिवशी पुण्यातून ही यात्रा सुरू होईल, नागपूरला याची सांगता होईल. वढू तुळापूर येथे नतमस्तक होऊन, खऱ्या अर्थाने यात्रेचा शुभारंभ होईल. संतांच्या, महाराजांच्या भूमीतून यात्रा जाईल. तेरा जिल्ह्यातून यात्रेचा प्रवास होईल.
रोहित पवार हे महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहतायेत का?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. त्यानंतर आता रोहित पवार यात्रा काढत आहे. त्यामुळे रोहित पवार हे महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहतायेत का?, असं प्रश्न विचारल्यास त्यांनी मोठ्या नेत्यांकडून प्रेरणा घेत यात्रा काढत असल्याचं सांगितलं. त्यासोबतच या यात्रेतून रोहित पवार हे पक्षापेक्षा स्वतःचा बॅनर मोठं करू पाहतायेत का? , असं विचारल्यास ते म्हणाले की माझा अजिबात तसा कोणताही प्रयत्न नाही. जयप्रकाश यांची मूव्हमेंट झाली तेव्हा ही असं काही बोललं जात होतं. मी फक्त सुरुवात करतोय, याचा अर्थ ही यात्रा रोहित पवारची आहे, असं म्हणणं योग्य नाही. मला स्वतःचं बॅनर मोठं करतोय असा अर्थ काढू नका, मी सर्वानाच सामील होण्याचं आवाहन करत आहे.
युवकांबद्दल कोणी बोलत नाही, ठोस भूमिका घेत नाही. लोकसंख्येत तरुणांचा टक्का मोठा असताना आम्हाला न्याय मिळत नाही. ही खदखद मी पवार साहेबांसमोर मांडली, त्यांनी ही याला दुजोरा दिला. मग आता यावर काय करता येईल? यावर साहेबांना विचारलं, त्यावर साहेबांनी जे तुम्हाला योग्य आणि प्रामाणिकपणे वाटतं ते करा असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर संघर्ष यात्रा सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.
25 ऑक्टोबरला पुण्यातून या यात्रेला सुरुवात...
महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या 40% पेक्षा जास्त तरुण आहे. जे आपल्या राज्याच्या भविष्याचा प्रतिनिधित्व करतात तरीही अलीकडच्या वर्षात तरुणांना त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी सरकारकडून आवश्यक सपोर्ट आणि प्रोत्साहन दिले जात नाही आपल्या राज्यात सद्यपरिस्थितीत वाढत्या बेरोजगारीचा दर परीक्षा घेण्यासाठी होणारा विलंब कायमस्वरूपी नोकरी ऐवजी कंत्राट नोकरभरती यामुळे आपल्या तरुणांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे आणि यामुळेच आम्ही राज्यभर फिरून युवा संघर्ष यात्रा काढणार आहोत. एकूण 850 किलोमीटरची ही पायी यात्रा असून येत्या 25ऑक्टोबरला पुण्यातून या यात्रेला सुरुवात होणार आहे.
यात्रेतून कोणते प्रश्न मांडणार?
ही यात्रा राष्ट्रवादी किंवा रोहित पवार यांची नाही. या युवा यात्रामध्ये फक्त शरद पवार यांचा फोटो असेल.
45 दिवसांच्या या यात्रेत आम्ही अनेक प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. काँट्रॅक्ट भरती रद्द करावी,तलाठी भरती साठी घेतलेले पैसे परत करावी,शाळा दत्तक जी आर रद्द करावा,अंतर कारण देत जिल्हा परिषद शाळा बंद केल्या जात आहेत त्या करू नये,उद्योग राज्यता आणावे आशा अनेक मागण्यांसाठी आम्ही यात्रा काढणार असल्याचं ते म्हणाले.
इतर महत्वाची माहिती-