Manjo Jarange : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील दोन दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर, आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा
Manoj Jarange : आज अहमदनगर शहरातील निंबळक रस्त्यावरील रेणुकामाता मंगल कार्यालयात जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.
अहमदनगर : मनोज जारांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आजपासून ते उत्तर महाराष्ट्राच्या (Maharashtra) दौऱ्यावर येत असून आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते अहमदनगर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. अहमदनगर शहरातील निंबळक रस्त्यावरील रेणुकामाता मंगल कार्यालयात जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी जीवाचे रान करणारे मनोज जरांगे पाटील हे 13 दिवसांचा महाराष्ट्र दौरा (Maharashtra Tour) करत आहेत. यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मनोज जरांगे पाटील जाणार आहेत. पाटील यांच्या दौऱ्याचा आजचा आठवा दिवस असून आज ते अहमदनगर जिह्याचा (Ahmednagar District) दौरा करणार करणार आहे. या दौऱ्यात मराठा समाजाशी संवाद आणि आरक्षण लढण्याची परिस्थिती समजून घेण्यासाठी हा दौरा असल्याचं मनोज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. आज सायंकाळी अहमदनगर शहरातील नागापूर एमआयडीसी येथील निंबळक रस्त्यावरील रेणुकामाता मंगल कार्यालयात सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, या सभेला मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे. पाथर्डी मार्गे स्टेट बँक चौकात जरांगे पाटील यांचे नगरमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर नागापूर एमआयडीसी येथील रेणुकामाता मंगल कार्यालयातील मैदानात त्यांची सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात होणार असून, सभेला ते संबोधित करणार आहेत. अहमदनगर सकल मराठा समाजाकडून गेल्या काही दिवसांपासून सभेचे नियोजन करण्यात येत आहे. या सभेला शहरासह जिल्हाभरातून मराठा समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. शनिवारी एमआयडीसीतील कारखान्यांना सुटी असते. त्यामुळे रस्त्यावर पार्किंगची सोय करण्यात आली असून, एमआयडीसी पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे..
असा आहे संपूर्ण दौरा
मनोज जरांगे हे कालच अहमदनगर जिल्ह्यातील चोंडीसह जामखेड या परिसरात मराठा बांधवांच्या भेटीसाठी आले होते. मात्र त्यानंतर ते पुन्हा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले. त्यानंतर आज शनिवार रोजी दुपारी तीन वाजेपासून उद्या सायंकाळपर्यंत ते अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यात आज दुपारी तीन वाजता पाथर्डी गावात त्यांचं आगमन होणार आहे. त्यानंतर तिसगाव, करंजी आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता अहमदनगर शहरात त्यांचं आगमन होणार आहे. या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर उद्या रविवार सकाळी साडेनऊ वाजता ते राहुरी शहरात दाखल होतील. त्यानंतर लोणी, राहता असा प्रवास करत ते साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणार आहेत. शिर्डी दर्शनानंतर ते नाशिक जिल्ह्याकडे प्रस्थान करतील. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील पांगरी गावात त्यांचा आगमन होणार आहे. या ठिकाणी मराठा बांधवांकडून त्यांचा स्वागत करण्यात येईल आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ते नाशिकमध्ये दाखल होतील आणि परवा सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी ते येवला तालुक्यातील निफाड विंचूर परिसरातील मराठा बांधवांच्या भेटी घेणार असून येवल्यात त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती आहे
इतर महत्वाच्या बातम्या :