एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 डिसेंबर 2019 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 डिसेंबर 2019 | गुरुवार*
- नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात तीव्र आंदोलन, लखनौमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीत संचारबंदी लागू, हैदराबाद, बंगळुरु, अहमदाबादेतही निदर्शनं, लेखक रामचंद्र गुहा, सीताराम येचुरींसह अनेक दिग्गज ताब्यात https://bit.ly/2Q0JFet
- महाराष्ट्रातही नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन, मालेगाव, औरंगाबाद, अमरावती, उस्मानाबाद, नाशिकमध्ये भव्य मोर्चा तर नागपूर, मुंबईतही तणावपूर्ण शांततेत निदर्शनं https://bit.ly/36UoBgH
- कितीही आंदोलनं झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणारच, कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांचं वक्तव्य तर तुकडे तुकडे गँग सोबत चर्चा नाही, प्रसाद यांनी ठणकावलं https://bit.ly/2PZJ1Ou
- गरीबांना तीन चाकी रिक्षाच परवडते, फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत उत्तर, https://bit.ly/35Jmufy तर 'कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र' राज्यात कधी येणार? तिथले लोक हिंदू नाहीत का? नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल https://bit.ly/36WGmMp
- कर्जमाफी, मंत्रिमंडळ विस्तारावर महाविकासआघाडीची खलबतं, 23 तारखेला विस्ताराची शक्यता, अजित पवारांची माहिती https://bit.ly/35DJwnY तर महाविकासआघाडी मुंबईत एकत्र निवडणूक लढवणार असल्याचा मंत्री बाळासाहेब थोरातांचा दावा https://bit.ly/2Z1kpsK
- सत्ता गेल्याने सैरभैर भाजपने राजकीय भाषणबाजीतच वेळ घालवला, विधानसभेतील पहिल्या भाषणात रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल https://bit.ly/38UjBu7
- शिवाजीराव गर्जे आणि अदिती नलावडे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून उद्या शपथ घेणार https://bit.ly/34zfwbh
- डिझेल अभावी रत्नागिरीत दुसऱ्यांदा एसटीच्या 270 फेऱ्या रद्द, विद्यार्थी, नोकरदारांचे हाल, नाशिकमध्येही एसटीचा ढिसाळ कारभार https://bit.ly/2Ev9Ogf तर मंत्रीमंडळ विस्तारानंतर एसटीचं राज्य शासनात विलिनीकरणाबाबत सकारात्मक निर्णय होतील, मंत्री एकनाथ शिंदेंचं कर्मचाऱ्यांना आश्वासन https://bit.ly/35ESqRU
- CAA विरोधात ट्वीट करताना भारताचा चुकीचा नकाशा वापरल्याप्रकरणी अभिनेता फरहान अख्तर अडचणीत, तर 'डॅम' म्हणणाऱ्या ट्रोलर्सची अभिनेत्री रेणुका शहाणेंकडून ट्विटरवर शाळा https://bit.ly/34znLV2
- आज डिजिटल माध्यमांमुळे प्रत्येकाला मोठा उद्योगपती होण्याची संधी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचं एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' कार्यक्रमात प्रतिपादन https://bit.ly/2PBzLRn
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
धाराशिव
बीड
Advertisement