एक्स्प्लोर
2018 मध्ये आई-बाबा झालेले दहा बॉलिवूड सेलिब्रेटी

1/10

नेहा धुपिया : अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी याच वर्षी मे महिन्यात विवाहबंधनात अडकले. नेहाने नोव्हेंबरमध्ये मेहरला जन्म दिला. त्याचवेळी आपण लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्याचा खुलासा तिने केला.
2/10

उदिता गोस्वामी : पाप, झहर यासारख्या चित्रपटातून गाजलेली अभिनेत्री उदिता गोस्वामी दुसऱ्यांदा आई झाली. 21 नोव्हेंबरला तिने 'कर्म' या मुलाला जन्म दिला. तिचा पती मोहित सुरी प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.
3/10

सनी लिओन : मार्च महिन्यात सनी लिओन दोन मुलांची आई झाली. अॅशर सिंग वेबर, नोआ सिंग वेबर अशी मुलांची नावं आहेत. यापूर्वी तिने निशाला दत्तक घेतलं होतं.
4/10

सुनिधी चौहान : सुनिधीला 1 जानेवारी 2018 रोजी मुलगा झाला. सुनिधीने संगीतकार हितेश सोनिकशी लग्न केलं आहे.
5/10

श्रेयस तळपदे : अभिनेता श्रेयस तळपदे 4 मे रोजी सरोगसीच्या माध्यमातून बाबा झाला. 14 वर्षांपूर्वी श्रेयस आणि दीप्ती विवाहबंधनात अडकले होते.
6/10

शाहीद कपूर : अभिनेता शाहीद कपूर 5 सप्टेंबरला दुसऱ्यांदा बाबा झाला. शाहीदने आपल्या बाळाचं 'झैन' असं नामकरण केलं
7/10

रंभा : 40 व्या वर्षी अभिनेत्री रंभा तिसऱ्यांदा आई झाली. कॅनडामध्ये 23 सप्टेंबरला रंभाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
8/10

नील नितीन मुकेश : अभिनेता नील आणि रुक्मिणी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात उदयपूरमध्ये लग्न केलं होतं. 20 सप्टेंबरला त्यांची कन्या नुर्वीचा जन्म झाला
9/10

लिसा रे : मॉडेल आणि अभिनेत्री लिसा रे आई झाली. सरोगसीद्वारे तिने जून महिन्यात जुळ्या मुलींना जन्म दिला. मुलींचा जन्म जॉर्जियामध्ये झाला. सुफी आणि सोलिएल अशी दोन्ही मुलींची नावं आहेत.
10/10

गुल पनाग : अभिनेत्री गुल पनागने फेब्रुवारी महिन्यात निहालला जन्म दिला. मात्र सहा महिने तिने ही गोष्ट लपवून ठेवली होती. आपलं वैयक्तिक आयुष्य जपण्यासाठी तिने ही गोष्ट जगजाहीर केली नाही.
Published at : 31 Dec 2018 12:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
