LIVE UPDATE | काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान भारतीय जवानांकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

Background
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. 220च्या आसपास जागा जिंकत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता, एबीपी- सीव्होटरचा एक्झिट पोल, सेनेच्या जागांमध्ये वाढ तर महाआघाडीला 60च्या आसपास जागा
2. महाराष्ट्रात सरासरी 60 टक्के मतदान, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक तर ठाण्यात सर्वात कमी मतदान, सव्वा तीन हजार उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद
3. विजयाच्या विश्वासासह सत्ताधारी नेत्यांचं मतदान, तर परिवर्तनाच्या निर्धारासह विरोधकांनी दाबलं ईव्हीएमचं बटण, दिग्गजांची धाकधूक वाढली
4.औरंगाबादेत जलील समर्थक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले, अमरावतीत स्वाभिमानीच्या उमेदवारावर गोळीबार, जालन्यात दोन गटात धक्काबुक्की
5. बॉलिवूडच्या स्टार्सनी बजावला मतदानाचा हक्क, सचिननं केलं वृद्ध मतदारांचं कौतुक, आमटे, बंग, पुरंदरे आणि संभाजी भिडेंचंही मतदान
6. रांची कसोटीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर; फॉलोऑननंतर दक्षिण आफ्रिकेची आठ बाद १३२ अशी अवस्था, भारताला विजयासाठी केवळ दोन विकेट्सची गरज























