(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG : चांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज शहीद
LIVE
Background
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. धनंजय मुंडेंनी पातळी सोडून टीका केल्याने पंकजा मुंडेंना भरसभेत भोवळ, सुरेश धसांचा आरोप, व्हायरल झालेली क्लिप बनावट असल्याचा धनंजय मुंडेंचा दावा
2. चार आठवड्यांच्या धुमशानानंतर राज्यातल्या प्रचारतोफा थंडावल्या, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी छुप्या प्रचाराला वेग, उमेदवारांची धाकधूक वाढली
3. मतदानाला काही तास उरले असताना राज्यात ठिकठिकाणी घबाड जप्त, वरळीत 4 कोटींची रोकड, मुंबईभर 47 लाखांचं मद्य जप्त, राज्यभर 511 शस्त्र हस्तगत
4. दर्शनासाठी 5 ते 25 हजार रुपये उकळणाऱ्या बाबाकडे 409 कोटींची माया, आंध्रातल्या कल्की बाबाच्या घरी आयकर विभागाचे छापे, 5 कोटींचे हिरेही हस्तगत
5. नरेंद्र मोदींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी बॉलिवूड अवतरलं, महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध संकल्पनावर पंतप्रधानांशी चर्चा
6. रोहित शर्माचं सलामीवीराच्या भूमिकेत मालिकेत तिसरं शतक साजरं; रोहितची रहाणेच्या साथीने 185 धावांची अभेद्य भागीदारी, भारत 3 बाद 224