(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE UPDATE | शिवसेनेच्या दोन महिला नेत्यांना ट्विटरवरुन धमकी, पोलिसात तक्रार दाखल
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर..
1. दिवाळीनंतर राज्यात राजकीय बैठकांचा सिलसिला, भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ठरणार पक्षनेता, राष्ट्रवादीच्या बैठकीतही विधीमंडळ नेत्याची निवड तर काँग्रेसचीही खलबतं
2. मुख्यमंत्रीपदाबद्दल फडणवीसांनी शब्द फिरवल्याने बैठक रद्द केल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट, तर सेनेची भूमिका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, मुनगंटीवारांचा पलटवार
3. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 1 किंवा 2 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरवण्याचं आव्हान
4. काँग्रेस हायकमांडकडून हवी तशी साथ न मिळाल्याने मोठं नुकसान, विरोधी पक्षनेते वड्डेटीवारांची 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यासमोर खंत, विदर्भातल्या नेत्यांवरही आसूड
5. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा, अनुचित प्रकार टाळण्यासाठी सत्ताधारी गटावर खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ
6. परतीच्या पावसाचा कहर सुरुच, मराठवाड्यात सोयाबीन तर विदर्भात कापसाचं मोठं नुकसान, मनमाडमधल्या द्राक्षांच्या बागा झोपल्या, रब्बीच्या पेरणीलाही मोठा फटका