भाजप स्वबळावर सत्तास्थापनेपासून 5 जागा दूर, एबीपी माझा सीवोटरच्या एक्झिट पोलचा अंदाज
LIVE
Background
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज (21 ऑक्टोबर) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही आज पावसाचा जोर कायम राहिला तर मतदारांना घराबाहेर कसं काढायचं असं आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. तिकडे मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोग, पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत. लोकशाहीचा हा उत्सव सुरुळीत पार पडावा म्हणून 4 लाख पोलीस तर 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची फौज कामाला लागली आहे. तर तिकडे ज्यांचं राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे त्या उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे. आज जवळपास पावणे नऊ कोटी मतदार सव्वा तीन हजार उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.