LIVE UPDATE | अमित शाह यांच्या सोलापूरातील दोऱ्यात तीन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार

Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. भाजपच्या दुसऱ्या टप्प्यातील मेगाभरतीचा मुहूर्त ठरला, अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश, हर्षवर्धन, उदयनराजे, रामराजे, राणा, महाडिक, गोरेंचा समावेश
2. खासदार नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन होणार, राणेंची एबीपी माझाला माहिती, दोन्ही मुलांसह भाजपात प्रवेश करणार
3. पाकिस्तानचा भारतात हिंसा घडवण्याचा डाव, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती, अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या गझनवी क्षेपणास्त्राचीही पाककडून चाचपणी
4. फ्लॅट धारक आता इमारतीच्या जमिनीचे मालक होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, जमिनीच्या सातबाराचे मालकीहक्क फ्लॅट धारकांना मिळणार
5. मुंबईतल्या पाच मोठ्या रस्त्यांवर महापालिकेकडून पार्किंग बंदी, चर्चगेटसह दादरमधील मार्गांचा समावेश, आजपासून निर्णयाची अंमलबजावणी
6. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, 15 सदस्यीय संघात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला स्थान नाही























