LIVE BLOG : सुषमा स्वराज यांची प्रकृती गंभीर, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल
LIVE
Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1.संविधानाचं कलम ३७० रद्द करण्याचा मार्ग मोकळा, राज्यसभेत प्रस्ताव मंजूर, जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द होणार.
2. जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करून दोन वेगळ्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती, लडाख विधानसभा नसलेलं, तर जम्मू-काश्मीर विधानसभा असलेलं केंद्रशासित प्रदेश
3. कलम 370 रद्द करण्याच्या भूमिकेचं शिवसेनेसह राज ठाकरेंकडून जोरदार स्वागत, गिरीश महाजनांनी धरला ठेका, काश्मीरी पंडितांकडूनही जल्लोष
4. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती पोलिसांच्या ताब्यात, राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर कारवाई
5. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाला मोठी गळती, दुर्घटनेपूर्वी तात्काळ दुरुस्ती करणं गरजेचं , जलविद्युत केंद्रात पाणी शिरल्यानं 55 गावांची वीज खंडीत
6. विद्यावेतन वाढीच्या मागणीसाठी मार्डचे डॉक्टर उद्या संपावर जाणार, 16 वैद्यकीय महाविद्यालयातील 4 हजार 500 डॉक्टर होणार सहभागी