LIVE BLOG : खासदार नारायण राणेंचा मोठा निर्णय, स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करणार

Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस, सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळण्याचं आश्वासन, मातोश्रीवर बैठकीनंतर अनिल परबांची माहिती
2. विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय,लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलक शिक्षकांचा आक्रमक पवित्रा
3. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा एकीकडे युतीचा दावा तर दुसरीकडे स्वबळाची तयारी, भाजपकडून 288 जागांवर इच्छुकांच्या मुलाखती
4. देशात 75 नवी मेडिकल कॉलेज सुरु होणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, काश्मीरमध्येही 50 हजार सरकारी पदांवर मेगाभरती होणार
5. ऑक्टोबर-नोव्हेंबरला भारत आणि पाकमध्ये युद्ध होणार, पाकिस्तानचे रेल्वे मंत्री राशीद अहमद यांची मुक्ताफळं, काश्मीरप्रश्नावरुन पाकिस्तानचा थयथयाट
6. राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'फिट इंडिया अभियान'चा शुभारंभ, आरोग्यविषयक जागृती करण्याचा मुख्य उद्देश























