एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG : पावसाचा जोर असल्याने रविवारच्या काही एक्सप्रेस रद्द
LIVE
Background
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही यामुळे परिणाम झाला आहे.
गेल्या 24 तासात मुंबईत 50 ते 100 मिमी तर उपनगरांमध्ये 150 ते 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझमध्ये 192 मिमी तर कुलाब्यात 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कल्याण, बदलापूर अंबरनाथ परिसरात शुक्रवारपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. याठिकाणी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मुसळधार पावसामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचलं आहे.
20:45 PM (IST) • 27 Jul 2019
मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे दिनांक 28.07.19 ला काही एक्सप्रेस रद्द केल्या आहेत.
गाडी क्रमांक 12118 अप आणि 12117 डाऊन मनमाड लोकमान्य टिळक टर्मिलन्स गोदावरी एक्सप्रेस दिनांक 28.07.19 ला रद्द करण्यात केलीली आहेत.
गाडी क्रमांक 22102 अप आणि 22101 मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस दिनांक 28.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहे .
गाडी क्रमांक 51153 डाऊन मुंबई भुसावळ पैसेजर गाडी दिनांक 28.07.19 ला रद्द करण्यात आलेली आहे
14:23 PM (IST) • 27 Jul 2019
#MahalaxmiExpress वांगणी येथे महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून रेस्क्यू केलेल्या प्रवाशांची बदलापूर स्थानकात व्यवस्था, सह्याद्री मंगल कार्यालयात जेवणाची व्यवस्था
14:46 PM (IST) • 27 Jul 2019
भिवंडी : वाशिंदचा रेल्वेखालचा बोगदा पाण्याखाली, 42 गावांचा संपर्क तुटला, गेरसे, कोसला, काकारपाडा, पलसोली, शेरे, अंबरजे, उशीद, हाल, फळेगाव, दहागाव, खातीवली, वासिंद, भातसई गावांचा संपर्क तुटला, रेल्वेच्या बोगद्यातील पावसाचे पाणी ओसरण्यासाठी किमान 4 ते 5 तास लागणार असल्याचे बोलले जात आहे.
16:31 PM (IST) • 27 Jul 2019
कांबा गावच्या राहिवाश्यांच्या आणि पर्यटकांच्या मदतीसाठी आता भारतीय लष्कर आले आहे, वायुदलाचे हेलिकॉप्टर, आर्मीच्या 3 टीम आणि नेव्हीची टीम देखील दाखल झाली आहे ,
आर्मीच्या एकूण 3 टीम 3 बोटी सह आल्या आहेत,
नेव्हीची डायव्हर्सची टीम 2 बोटीसह अली आहे,
कांबा गावात काही गावकरी आणि रिसॉर्टमध्ये काही पर्यटक अडकले आहेत,
13:12 PM (IST) • 27 Jul 2019
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे वांगणी येथे दाखल
Load More
Tags :
Today's News In Marathi Abp Majha Latest Marathi News Trending News Aaj Divasbharat Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement