LIVE BLOG | माझा सन्मान 2019 : सोहळ्याला मोठ्या दिमाखात सुरुवात, उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या रत्नांचा गौरव
LIVE
Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. पालघर परिसर भूकंपाने हादरला, रात्री 1च्या सुमारास डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, 4.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेची माहिती
2. राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपचा गळाला लागण्याची शक्यता, अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
3. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा, मुंबईत राष्ट्रवादीला मोठा धक्का
4. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत मेगाब्लॉक, 15 दिवस डेक्कन-प्रगती एक्स्प्रेस रद्द, अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलले
5. राज्यातील आस्थापनांमध्ये काम असणाऱ्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ, कामगार कल्याण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, 1 कोटी कामगारांना फायदा
6. 72 हजार जागांसाठी जाहीर केलेल्या मेगाभरतीला पुन्हा आचारसंहितेमुळे ब्रेक लागण्याची चिन्ह, राज्यभरातले लाखो तरुण हवालदिल