LIVE BLOG : 'शिवसेनेकडून पक्षात येण्यासाठी आतापर्यंत 25 फोन', विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
LIVE
Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1.आजपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथून यात्रेला प्रारंभ, 1 ते 31 ऑगस्टदरम्यानच्या दौऱ्यात राज्यातील विविध भागांना भेटी
2. खतांवरची 70 हजार कोटींची सबसिडी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, केंद्राचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचीही संख्या वाढवणार
3. शिवेंद्रराजे, चित्रा वाघ, पिचड पिता-पुत्र, नाईक बंधू भाजपात, राष्ट्रवादीतल्या अंतर्गत गटबाजीवर बोट, काँग्रेसचे कोळंबकरही भाजपवासी
4. ईव्हीएमबाबत न्यायालय आणि निवडणूक आयोगावरही विश्वास नाही, कोलकात्यामध्ये ममता बॅनर्जींच्या बैठकीनंतर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया
5. तुलसी, तानसा, मोडकसागरपाठोपाठ विहार तलावही ओव्हर फ्लो, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 85 टक्के पाणीसाठा, मध्य वैतरणा, भातसा धरणाचे दरवाजे खुले
6. करण जोहरच्या घरातल्या पार्टीच्या व्हीडिओवरून राजकीय वाद शिगेला, रेव्ह पार्टीच्या संशयावरून नेटिझन्सचे सवाल, मिलिंद देवरांकडून करणचा बचाव