Live Blog | मुंबईसह परिसरात पावसाला जोरदार सुरुवात, अचानक आलेल्या पावसाने दाणादाण उडाली, लोकल खोळंबल्या

Background
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर
1. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषकातला दुसरा विजय साजरा, धवन, विराट, रोहितची दमदार बॅटिंग; भुवनेश्वर, चहल, बुमराची गोलंदाजीत कमाल
2. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच, अमित शाहांसोबतच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय, प्रदेशाध्यक्षपदी तूर्तास दानवेच
3. पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर आज भाजपकडून बंदची हाक, आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू, राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता
4. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती बालाजींच्या चरणी, अर्धा तास पूजा, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचीही हजेरी
5. पुणे आणि पिंपरीतील आयनॉक्स, पीव्हीआरमध्ये समोस्यावर बंदी, प्रचंड अस्वच्छतेमुळं अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय
6. राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, तर अरबी समुद्रात चक्रीवादळाचा हवामान विभागाचा इशारा, मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला























