LIVE BLOG : पी चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश

Background
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
1. हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पी. चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात, मोठ्य़ा खाटाटोपानंतर अटक, निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांना जोरदार राडा
2. कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी आज राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी, चौकशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख बंदोबस्त
3. नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सी कार्यरत, राज ठाकरेंच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर राणेंचा गौप्यस्फोट, भाजपप्रवेशासंदर्भात 10 दिवसांत निर्णय घेणार
4.राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, उदयनराजेंसह, महाडीकांच्या नावाची चर्चा, तर भुजबळांच्या सेना प्रवेशाचा सस्पेन्स कायम
5.आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमधला पत्रव्यवहार माझाच्या हाती, राष्ट्रवादीला उल्लेख टाळून काँग्रेसला गर्भित इशारा
6.देशातल्या सर्वात मोठ्या बिस्किट कंपनीला मंदीचा फटका, पार्ले बिस्किट कंपनीतल्या 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता























