(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG | कोल्हापूर : पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर
LIVE
Background
1. भारतावर समुद्री मार्गे दहशतवादी हल्ल्याची भीती, कलम 370 रद्द केल्यानं पाकची दहशतवाद्यांना चिथावणी, गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर नौदल सज्ज
2. कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांचा रशिया दौरा रद्द, सूत्रांची माहिती, पंतप्रधान मोदींनी रशिया दौऱ्यासाठी केली होती फडणवीसांची निवड
3. कोल्हापूर सांगलीतला पूर ओसरायला सुरुवात, मात्र चिखलाच्या साम्राज्यामुळे रोगराई परसण्याची भीती, सरकारी यंत्रणांसमोर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं आव्हान
4. संकटकाळी निवडणुकीचा मुद्दा सुचतोच कसा?, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला, पूर ओसरल्यानंतर सर्वतोपरी मदत करण्याचंही आश्वासन
5. कलम 370 हटवल्यानंतर जम्मूच्या खोऱ्यात ईदचा उत्साह, मुंबईत सामूहिक नामाज पठण तर सांगली कोल्हापुरात ईदला फाटा देत पूरग्रस्तांना मदत
6. दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर विजय, डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात, विराट कोहलीची रेकॉर्डब्रेक कामगिरी