(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE BLOG | हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश, मुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटलांची उपस्थिती
LIVE
Background
1. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये भाजपची आज तिसरी मेगाभरती, काँग्रेसचा हात सोडणाऱ्या हर्षवर्धन, आनंदराव पाटलांचा आज भाजपात प्रवेश, तर उदयनराजे आणि राणे पिता-पुत्र वेटिंगवरच
2. भाजप-शिवसेना युतीचा तिढा कायम, शिवसेना 50-50 फॉर्म्युल्यासाठी आग्रही, गृहमंत्री अमित शाह घेणार युतीचा अंतिम निर्णय
3. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा राजीनामा, पत्राद्वारे केली काँग्रेसच्या कारभाराची पोलखोल, मुंबईतल्या नेत्यांविरोधात तक्रारीचा सूर
4. विधानसभेसाठी राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासंदर्भात कोणतीही चर्चा नाही, दिल्लीत सोनिया गांधींशी भेट घेतल्यानंतर शरद पवारांची माहिती
5. नवी वाहनं खरेदी करण्याऐवजी लोकांचा ओला-उबरकडे कल, ऑटोमोबाईल उद्योगात मंदी येण्यास ओला-उबर कारणीभूत, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दावा
6. जम्मू-काश्मीर भारताचं राज्य, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जम्मू-काश्मीरविरुद्ध गरळ ओकल्यानंतर बाहेर मात्र कबुली
7. “आरेला हात लावू देणार नाही”, आदित्य ठाकरे यांनी ठणकावलं, जागा सुचवण्यात घोटाळा झाल्याचाही संशय, अश्विनी भिडे यांच्या बदलीचीही मागणी
8. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युती अखेर तुटली, इम्तियाज जलील यांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका, असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून स्पष्ट
9. अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी देण्यास हायकोर्टाचा नकार, जन्माला येणाऱ्या बाळाला दत्तक देण्याची मुभा
10. अॅपलकडून आयफोन 11, अॅपल वॉच, आयपॅडचं लॉन्च, अनेक नव्या फिचर्सचा समावेश, भारतात 13 सप्टेंबरपासून प्री-बुकिंग