LIVE BLOG : अतिउच्च वीज वाहिनीत बिघाडामुळे पालघरमधील चार तालुके अंधारात

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आजपासून सुरुवात, विदर्भात 7 मतदारसंघामध्ये आज मतदान, सकाळी 7 ते सायंकाळी 6 करा मतदान
2. जळगावात भाजपच्या मेळाव्यात नाराजीनाट्यातून तुफान राडा, जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी. एस. पाटील भिडले, मध्यस्थी करणाऱ्या गिरीष महाजनांची दमछाक
3. लोकसभा निवडणुकांदरम्यान पीएम मोदी सिनेमाच्या प्रक्षेपणास बंदी, निवडणूक आयोगाचा निर्णय, तर मोदींना पाठिंबा देण्यावरून कलाविश्वात फूट
4. तब्बल 100 वर्षांनंतर जालियनवालाबाग हत्याकांडावर इंग्लंडला पश्चात्ताप, पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केला खेद
5. अंतराळातला कृष्णविवर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, शास्त्रज्ञांकडून फोटो जाहीर, पृथ्वीच्या निर्मितीचं कोडं उलगडण्यासाठी होणार मोठी मदत
6. कर्णधार कायरन पोलार्डच्या फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सचा पंजाबवर सनसनाटी विजय, पोलार्डची 31 चेंडूत 83 धावांची निर्णायक खेळी



















