LIVE BLOG | #CSKvDC :चेन्नई सुपरकिंग्जकडून दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सनी धुव्वा

Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. युद्धनौकेच्या वापरावरून मोदींनी राजीव गांधींवर केलेल्या आरोपानंतर राजकारण तापलं, नौसेनेच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून आरोपांचं खंडन, काँग्रेसचा मोदींवर पलटवार
2. अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, त्रिसदस्यीस समितीकडून तोडगा काढण्यासंबंधीचा अहवाल आज सुपूर्द होण्याची शक्यता
3. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी यंदा मराठा आरक्षण नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, प्रवेश खोळंबू नये म्हणून महाराष्ट्र केंद्राकडे जादा जागा मागणार
4. जेट एअरवेजनं गाशा गुंडाळल्यानं हापूस आंब्याच्या परदेशातील निर्यातीला फटका, नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस पडून
5. पोलीस व्हॅनमध्येच गुंडाकडून टिकटॉकचा व्हिडीओ शूट, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट, नागपूर पोलिसांची अब्रू वेशीवर
6. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, सचिनच्या बॉलिंगवर विनोद कांबळीची बॅटिंग























