LIVE BLOG : रत्नागिरी : राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार

Background
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
१. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये रात्रभर पावसाच्या जोरदार सरी, अनेक सखल भागांत पाणी साचलं, येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधारेचा अंदाज
२. कोल्हापुरातील राधानगरी धरणक्षेत्रात पाऊस, सर्व स्वयंचलित दरवाजे खुले, भोगावती नदीपात्रात मोठा विसर्ग, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ
३. दोन दिवसांपासून गडचिरोलीत पावसाचं धूमशान, मुख्य रस्ते पाण्याखाली, 300 गावांचा संपर्क तुटला
४. मुंबईतल्या मेट्रोच्या पायाभरणीसह मोदींकडून वेगवेगळ्या प्रकल्पांचं भूमिपूजन, औरंगाबादमध्ये ऑरिक सिटीचं उद्घाटन, तर महिला बचत गटांसाठी मोठ्या घोषणा
५. येत्या 2 ते 4 दिवसांत युतीचं जागावाटप निश्चित होणार, खुद्द उद्धव ठाकरेंची घोषणा, नरेंद्र मोदींकडून उद्धव ठाकरेंचा लहान भाऊ म्हणून उल्लेख
६. विधानसभेसाठी काँग्रेस 10 तारखेला पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता, काँग्रेसनं 60 तर राष्ट्रवादीनं 70 उमेदवारांची नावं निश्चित केल्याची सूत्रांची माहिती























