LIVE BLOG : सांगली कोल्हापुरातील पुरामुळे भाजपची राजकीय कार्यक्रमांना स्थगिती, महाजनादेश यात्रेलाही ब्रेक!

Background
१. पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे मुंबईत दुधाचा तुटवडा, 13 लाख लिटर दुधाची आवक घटली
२. राधानगरीत धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला, 18 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, कोल्हापुरात पाणी वाढण्याची शक्यता
३. सांगली, साताऱ्यातही पावसाचं थैमान सुरुच, सांगलीतील अनेक गावंही महापुरात बुडाली, येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा
४. जम्मू-काश्मीरमधील कलम-370 रद्द केल्यावर पाकिस्तानचा तिळपापड, भारताशी व्यापारी संबंध तोडले, भारतातील उच्चायुक्तांनाही परत बोलावलं
५. मिशन काश्मीरनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल शोपियानच्या रस्त्यांवर, सुरक्षा व्य़वस्थेचा आढावा, स्थानिकांसोबत जेवणाचा आस्वाद
६. सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात, ०.35 टक्क्यांच्या कपातीनंतर नवा दर 5.40टक्क्यांवर, कर्जावरील EMI स्वस्त होणार























