दारादारात रांगोळ्या... घराघरांवर गुढ्या... रस्त्यात फुलांचा सडा... आणि झांजपथक... गोलिवडे हे शरद पवार यांचं आजोळ आहे. जेमतेम अडीच ते तीन हजार लोकवस्ती, मात्र या गावाचा संबंध शरद पवार यांच्याशी असल्यामुळे या गावातल्या प्रत्येक ग्रामस्थाला अभिमान आहे
2/7
पवार कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावात बोलत होते. गोलिवडे हे शरद पवार यांचं आजोळ आहे.
3/7
गावाच्या वतीने शरद पवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना शरद पवार हे भारावून गेले होते. गोलिवडे गावाचा आपल्या आईचा ऋणानुबंध सांगत गावाशी असलेले नातेसंबंध उलगडले. तसेच आपल्या आईच्या अनेक आठवणींना पवारांनी उजाळा दिला.
4/7
खरंतर लग्नासाठी मामाच्या गावची पोरगी करण्याची पद्धत आहे. पण माझ्या नशिबात हा योग नाही, असं मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
5/7
लहान असताना मामाच्या गावची मुलगी करण्याची इच्छा होती. कारण तशी पद्धत आहे. पण माझ्या नशिबात हा योग नाही. या गोष्टीला 50 वर्ष झाल्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. मामाच्या गावाला यायला खूप उशीर झाला आणि आता ते शक्यही नाही, असं पवार म्हणताच एकच हशा पिकला.
6/7
आपल्या गावाचा नातू हा देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचावा आणि ते लवकरात लवकर पंतप्रधान व्हावे म्हणून गोलिवडे ग्रामस्थांनी ग्रामदेवतेला साकडं घातलं आहे. तसंच शरद पवार यांच्या भेटीने गावचं नाव जगाच्या नकाशावर आल्याची भावना व्यक्त केली.
7/7
शरद पवार यांचं गोलिवडे गावात आगमन होताच झांज पथकाच्या नादात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील महिलांनी त्यांचं औक्षण केलं आणि ते व्यासपीठावर आले. हिरव्या साड्या परिधान केलेल्या महिला आणि फेटे घातलेले गावकरी शरद पवारांकडे डोळे भरुन पाहत होते.