एक्स्प्लोर
सामना, सुपर ओव्हर टाय, बाऊंड्रीजच्या जोरावर 'साहेब' वर्ल्डकप जिंकले

Background
महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर
- ईशान्य भारत आणि बिहारमध्ये पावसाचा कहर, तब्बल 14 लाख नागरिकांना पुराचा फटका, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, लाखो हेक्टरवरील पीक नष्ट
- पश्चिम बंगालमधले विरोधी पक्षाचे 107 आमदार भाजपच्या वाटेवर, मुकुल रॉय यांचा दावा, तर मध्य प्रदेश आणि राजस्थानही भाजपच्या निशाण्यावर, प्रकाश जावडेकरांचं सूचक विधान
- भाजप नेत्याकडून धोनीच्या राजकीय प्रवेशाचे संकेत, झारखंडच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या संजय पासवान यांचं सूचक विधान
- बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, मुजफ्फर हुसैन, बसवराज पाटलांची कार्याध्यक्षपदी निवड
- महाराष्ट्रात काल दिवसभरात 7 हत्या, तिहेरी हत्याकांडानं साईबाबांची शिर्डी हादरली, नवी मुंबईतही तीन मजुरांचा घात , तर नागपुरात मॉडेलची निर्घृण हत्या
- वारणा-कृष्णेच्या संगमावर एकाचवेळी तब्बल 15 मगरींचं दर्शन, ग्रामस्थ प्रचंड दहशतीत, वनअधिकाऱ्यांसमोर मगरींच्या बंदोबस्ताचं मोठं आव्हान
00:12 AM (IST) • 15 Jul 2019
विश्वचषक स्पर्धा 2019 च्या अंतिम सामना अत्यंत रोमहर्षत झाला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 241 धावा काढल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनेदेखील 241 धावा करुन सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने 15 धावा करुन न्यूझीलंडला 16 धावांचे आव्हान दिले. परंतु न्यूझीलंडनेदेखील 15 धावा करुन सुपर ओव्हर बरोबरीत सोडवली. परंतु सामन्यातील बाऊंड्रीजच्या (चौकार आणि षटकार) संख्येच्या बळावर इंग्लंडने हा सामना जिंकला. इंग्लंडने सामन्यात एकूण 24 बाऊंड्रीज ठोकल्या होत्या. तर न्यूझीलंडने केवळ 16 बाऊंड्रीज ठोकल्या होत्या. त्यामुळे हा सामना इंग्लंडने जिंकला.
19:40 PM (IST) • 14 Jul 2019
कर्नाटक : 14 बंडखोर आमदार राजीनाम्यावर ठाम, राजानामा दिलेल्यांपैकी 14 आमदार (9 काँग्रेस, 3 जेडीएस, 2 अपक्ष) राजीनाम्यावर ठाम आहेत
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























