एक्स्प्लोर
LIVE BLOG | लोकसभा निवडणुकासाठी काँग्रेसची 15 उमेदवारांची यादी जाहीर, अमेठीतून राहुल गांधी, रायबरेलीतून सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार

Background
- आचारसंहितेच्या आधी फडवणीस याचं गतीमान सरकार... एका दिवसात काढले तब्बल ५८ जीआर.. एका दिवसात शासन निर्णयांची हाफ सेंन्चुरी..
- राफेल कराराची कागदपत्रं चोरीला, सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याची राहुल गांधींची मागणी
- लोकसभेसाठी युतीच्या वादग्रस्त जागांचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आज मातोश्रीवर, खोतकर वाद आणि सोमय्यांच्या विरोधावर चर्चेची चिन्हं
- अहमदनगरच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या बैठकीत सुजय विखे पाटलांच्या जागेबाबत शरद पवार निर्णय घेणार
- राज्यातल्या 382 शहरांसह लगतच्या शासकीय जमिनीवरची अतिक्रमणे नियमित, सर्वांसाठी घरं योजनेसाठी सरकारचा मोठा निर्णय
- मुंबईतल्या महालक्ष्मीमध्ये कार सर्व्हिस सेंटरला आग, महागड्या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही
- केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका, बेस्ट परफॉर्मन्सच्या यादीत अव्वल तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राला स्थान, मुंबई-पुण्याची मात्र घसरण
23:01 PM (IST) • 07 Mar 2019
पुणे : महानगरपालिकेच्या दारात आज मुस्लिम बांधवांनी मृतदेह ठेवून आंदोलन केलं. पुण्यातील खराडी - चंदन नगर परिसरात मुस्लीम समाजाला कब्रिस्थानसाठी जमिन मोकळी करून देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
22:17 PM (IST) • 07 Mar 2019
काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचे निधन, गुरुदास कामत यांचे समर्थक म्हणून ओळख होती, प्रवक्ता म्हणून काँग्रेसची बाजू मांडायचे
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र























