LIVE BLOG | आज दिवसभरात... 15 फेब्रुवारी 2019

Background
1. देशावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, जम्मू काश्मिरमधील पुलवामात अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या बसवर धडकवली, 39 जवान शहीद, तर 20 जखमी
2. हल्ल्यामुळे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची सकाळी महत्त्वाची बैठक, तर हल्ल्याचा तपास करण्यासाठी एनआयए, एनएसजी काश्मीरला रवाना
3. पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, गृहमंत्री राजनाथ सिंहांचा दावा, शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा
4. अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात पाकविरोधी घोषणाबाजी, पाकिस्तानचा बदला घ्या, मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील नागरिकांची रस्त्यावर उतरुन मागणी
5. युतीबाबत शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती, लवकरच युतीची घोषणा होण्याची शक्यता
6. लष्करी शस्त्रास्त्रं आणि जीवनशैलीचं आजपासून प्रदर्शन, परळच्या कामगार मैदानात खास कार्यक्रम, लक्ष्य फाऊंडेशनचा उपक्रम



















