World Aids Day: जगभरातील 80 लाख लोकांना माहीत नाही त्यांना एड्स आहे, भारतात 20 ते 25 लाख एड्सग्रस्त
अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स) सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतासह संपूर्ण जगभरात अनेक प्रयत्न केले जात आहेत. दरवर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे साजरा केला जातो.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने यावर्षी जागतिक एड्स दिनानिमित्त एक स्पेशल थीम ठेवली असून तिचं नाम 'कम्युनिटी मेक द डिफरेंस' ठेवण्यात आलं आहे. हा गंभीर आजारावर योग्य उपचार शोधण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक वैज्ञानिक रिसर्च करत आहेत. एका वैज्ञानिकाने दावा केला आहे की, एका इंफ्यूजन नावाच्या पद्धतीने एड्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.It's #WorldAIDSDay. There were approximately 37.9 million people living with #HIV at the end of 2018. 🔹79% had been diagnosed 🔹62% were receiving treatment 🔹53% had achieved suppression of the HIV virus to the point at which they were at low risk of infecting others. pic.twitter.com/L6Zlv31Gnk
— World Health Organization (WHO) (@WHO) November 30, 2019
दरम्यान, याआधीही एड्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक नव्या पद्धती वापरण्यात आल्या आहेत. परंतु, यामुळे काही खास फायदा झाला नाही. अशातच इंफ्यूजन नावाची ही पद्धत एड्सग्रस्त लोकांसाठी एक नवी उमेद आहे. संपूर्ण जगभरात जवळपास चार कोटी लोक एड्ससारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. तर फक्त भारतातच हा आकडा 20 ते 25 लाख इतका आहे. सर्वात आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, जगभरात 80 लाख लोकांना हे माहीतच नाही की, त्यांना एड्स आहे.#HIV is NOT🚫🙅♂️🙅♀️ transmitted by: 💋kissing 🤝handshaking 👋touching 🦟mosquitoes or other insects 🥘sharing food#WorldAIDSDay pic.twitter.com/iu0YNbyETF
— World Health Organization Western Pacific (@WHOWPRO) December 1, 2019
भारतात लोक समाजाच्या भितीने या आजाराबाबत कोणालाही सांगत नाहीत आणि त्यावर उपचारही घेत नाहीत. परिणामी त्यांच्या गंभीर परिणामांचा सामना करावा लागतो. एवढचं नाहीतर समाजही एचआयव्ही ग्रस्त लोकांना व्यवस्थित वागणूक देत नाही. त्यामुळे लोक या आजाराबाबत काहीही बोलताना घाबरतात.The #HIV infection weakens the immune system and they can develop other signs and symptoms such as: ➡️Swollen lymph nodes, 😰 ➡️Weight loss ➡️Fever 🤒 ➡️Diarrhea 🥵 ➡️Cough 😳🍃 Without treatment, HIV could also develop severe illnesses.
Learn more:https://t.co/AUKuT73cwM pic.twitter.com/bX3hHhMZCM — World Health Organization Western Pacific (@WHOWPRO) December 1, 2019
एड्सचा संसर्ग अनेक कारणांमुळे होतो. जसं, संक्रमित रक्त, संक्रमित सुई किंवा सिरींज, असुरक्षित यौन संबंध. या मुख्य कारणांमुळे एड्स पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे याआजारापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय करण्याची गरज आहे. अनेक एनजीओ आणि संस्था एड्सबाबत जनजागृती करण्याचं काम करत आहेत. याच कारणामुळे एड्समुळे होणारा मृत्यूदर घटला आहे. टिप : सदर माहिती एका अहवालानुसार वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. संबंधित बातम्या : हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार सावधान! त्वचेसाठी 'या' उत्पादनांचा वापर करणं ठरू शकतं घातक कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!LoveYourself is a community of volunteers that have been affected one way or another by HIV. “We are the community, so we know how to reach out to the community," said Danvic from LoveYourself. Communities are helping to scale up PrEP in the Philippines: https://t.co/s4AQbwObY9 pic.twitter.com/67H4CM55lY
— World Health Organization Philippines (@WHOPhilippines) December 1, 2019