एक्स्प्लोर

Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटीचा अपघात, बस दरीत घरंगळत जाऊन झाडाला अडकली, धरणात पडता पडता वाचली

Ratnagiri Accident: रत्नागिरीत एसटी बसचा अपघात. एसटी बस दरीतून थेट धरणात कोसळणार होती. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला

रत्नागिरी: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले. (Ratnagiri ST Bus Accident)

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात झाला त्यावेळी एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. यापैकी एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या दरीच्या खालच्या बाजला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, दरीतील एका झाडला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. तोपर्यंत अनेक प्रवाशी बसमध्ये जीव मुठीत धरुन बसले होते. 

ही बस दरीत कोसळल्यानंतर एका बाजुला पूर्णपणे आडवी पडली होती. या अपघातावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एसटी बसच्या मागच्या भागात अडकलेले प्रवासी दिसत आहेत. हे प्रवासी ज्यांना शक्य आहे त्यांना बसमधून बाहेर पडा असे सांगत आहेत. जितक्या लोकांचा जीव वाचेल तेवढे जण वाचतील, तुम्ही बाहेर पडा, असे हे प्रवासी इतरांना सांगतानाचे व्हिडीओत ऐकायला येत आहे. हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. 

नाशिकमध्ये भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू

नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो मागच्या बाजूने ट्रकला जाऊन धडकला. या ट्रकमध्ये लोखंडी सळ्या असल्याने धडकेनंतर या सळ्या टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या. त्या थेट टेम्पोच्या मागच्या बाजूला असणाऱ्या लोकांच्या शरीरात घुसल्या. त्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा

सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटीचा अपघात, बस दरीत घरंगळत जाऊन झाडाला अडकली, धरणात पडता पडता वाचली
रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटी बस दरीत कोसळली, झाड आडवं आल्याने अनर्थ टळला
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली,
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली, "हा भयानक अनुभव..."
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 13 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNarayan Rane on Vaibhav Naik:सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या घराला टाळं मारेन- नारायण राणेABP Majha Marathi News Headlines 8AM Headlines 08AM 13 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNashik Dwarka Bridge Accident : द्वारका ब्रिजवर भीषण अपघात; तरुणांचा अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटीचा अपघात, बस दरीत घरंगळत जाऊन झाडाला अडकली, धरणात पडता पडता वाचली
रात्रीच्या किर्रर्रर्र अंधारात रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एसटी बस दरीत कोसळली, झाड आडवं आल्याने अनर्थ टळला
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली,
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा; सोशल मीडियावर अपडेट शेअर करत म्हणाली, "हा भयानक अनुभव..."
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
बुलढाणा केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Nashik Accident: टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकच्या द्वारका पुलावर अपघात नेमका कसा घडला?
टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर
Embed widget