Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची मस्साजोगमध्ये भेट घेणार; भावाचा आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो
Manoj Jarange Patil : आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख वाल्मिक कराडला मोक्का लावला गेल्या नसल्याने न्यायासाठी आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो करणार आहेत.
Manoj Jarange Patil : संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासाची माहिती देशमुख कुटुंबीयांना दिली जात नसल्याने आणि खंडणीप्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मीक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणातही आरोपी करावे व त्याच्या विरोधामध्ये मोक्का लावावा या मागणीसाठी गावकरी आज सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मस्साजोगचे गावकरी एकत्रित जमले आणि त्यांनी परवा दिवशी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील आज देशमुख कुटुंबाच्या भेटीला
दरम्यान, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख वाल्मिक कराडला मोक्का लावला गेल्या नसल्याने न्यायासाठी आज टाॅवरवर चढून न्यायासाठी टाहो करणार आहेत. हे आंदोलन करत असतानाच आज मनोज जरांगे पाटील मस्साजोगमध्ये पोहोचत आहेत. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे, मदत करणाऱ्यांनाही शिक्षा झाला पाहिजे, तसेच धनंजय मुंडे यांच्याविरोधातही जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल आहे.
परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू
दरम्यान, परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने रविवारी सरपंचाला उडवल्याने हा सुद्धा घातपात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान टिप्पर चालकाने आहे त्याच ठिकाणी टिप्पर सोडून पळ काढला होता. अखेर पोलिसांनी या टिप्पर चालकाला ताब्यात घेतले असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. शेतातील काम आटपून सरपंच अभिमन्यू क्षीरसागर परळीकडे निघाले होते. याच दरम्यान एका राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परळी पोलिसांनी टिप्पर चालक भोजराज देवकरच्या विरोधात गुन्हा दाखल करून टिप्पर पोलीस ठाण्यात जमा केले. टिप्पर चालक पोलिसांच्या हाती लागला आहे. हा अपघात की घात? असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
विष्णू चाटेला आज पुन्हा केज न्यायालयात केले जाणार हजर
दुसरीकडे, सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला आज केज न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. खंडणी प्रकरणात चाटेला शनिवारी केज न्यायालयात हजर केले होते. यादरम्यान न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, देशमुख हत्या प्रकरणात देखील चाटे आरोपी असल्याने सीआयडीने केज न्यायालयाकडे चाटेच्या कस्टडीची मागणी केली होती. दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर आज विष्णू चाटेला पुन्हा एकदा केज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या