एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Women Health : दोन महिन्यांपासून अंतराळातच, सुनीता विल्यम्सना 'हे' गंभीर आजार अन् मृत्यूचा धोका? अंतराळात दीर्घकाळ राहण्याचा शरीरावर काय होतो परिणाम? 

Health : अंतराळात दीर्घकाळ राहण्याचा काय परिणाम होतो आणि त्यांना तेथे जास्त काळ राहावे लागल्यास काय समस्या येऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया...

Health : अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर जवळपास दोन महिने अंतराळात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने सुनीता विल्यम्स यांच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? तसेच त्यांना तेथे जास्त काळ राहावे लागल्यास काय समस्या येऊ शकतात? जाणून घेऊया...

सुनीता विल्यम्सच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त

नासाचे दोन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 2 जून रोजी एका आठवड्यासाठी अंतराळ मोहिमेवर पाठवण्यात आले होते, त्यानंतर ते अद्याप पृथ्वीवर परत येऊ शकलेले नाहीत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते जवळजवळ दोन महिने अंतराळात आहे, त्यामुळे आता त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. नासाच्या अहवालानुसार ते फेब्रुवारी 2025 पूर्वी पृथ्वीवर परत येऊ शकणार नाहीत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनेक महिने अंतराळात राहिल्यामुळेअंतराळवीरांच्या डीएनएला धोका आहे. ते म्हणतात, अंतराळात जास्त काळ राहिल्याने शरीरात असे अनेक बदल होतात, ज्यामुळे आरोग्याला खूप नुकसान होते. दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे सुनीता विल्यम्सला आरोग्याशी संबंधित कोणते नुकसान होऊ शकतात ते जाणून घेऊया.

हाडे आणि स्नायूंचे नुकसान

अंतराळातील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत नगण्य आहे, परंतु सूक्ष्म गुरुत्वाकर्षण दीर्घकाळ राहिल्यामुळे, हाडे आणि स्नायूंची घनता कमी होऊ लागते. याला बोन्स आणि मसल लॉस होणे असेही म्हणतात.

स्पेस ॲनिमियाचा धोका

इतकेच नाही तर अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शरीरातील द्रवपदार्थांमध्येही बदल होतो, त्यामुळे पृथ्वीच्या तुलनेत अंतराळात लाल रक्तपेशी नष्ट होतात. याव्यतिरिक्त, स्पेस रेडिएशनमुळे होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण लाल रक्तपेशींना देखील नुकसान करतो. नासाच्या मते, पृथ्वीवर एका व्यक्तीच्या शरीरात प्रत्येक सेकंदाला सुमारे 20 लाख लाल रक्तपेशी तयार होतात आणि नष्ट होतात, परंतु अंतराळात ही संख्या 30 लाखांपर्यंत वाढते. त्यामुळे अंतराळवीरांना स्पेस ॲनिमिया होतो.

कर्करोगाचा धोका

अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये हृदय देखील योग्यरित्या कार्य करू शकत नाही. त्यामुळे हृदयाच्या संरचनेतही बदल होतात. याव्यतिरिक्त, स्पेस रेडिएशनच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका देखील वाढतो. अंतराळातून परतल्यानंतर अनेक अंतराळवीरांनी डोळ्यांशी संबंधित समस्याही सांगितल्या आहेत.

डीएनएमध्ये असमानता

तज्ज्ञांच्या मते, कॉस्मिक रेडिएशन हे अत्यंत उच्च उर्जेच्या कणांनी बनलेले असते, जेव्हा ते संपर्कात येतात तेव्हा डीएनए स्ट्रेंड तुटतात आणि बदल होऊ लागतात. याचा परिणाम अनुवांशिक असमानता देखील होऊ शकतो. अंतराळवीरांच्या आरोग्याशी संबंधित ही सर्वात गंभीर समस्या आहे. नासा रेडिएशनच्या पातळीचे निरीक्षण करत असले तरी, सुनीता विल्यम्सच्या बाबतीत ते अधिक धोकादायक आहे कारण तिला दीर्घकाळ याच्या संपर्कात राहावे लागू शकते. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

सुनीता विल्यम्स अवकाशातून परत कधी येऊ शकणार?

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 10 दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते, परंतु बोईंग स्टारलाइनरमधील तांत्रिक बिघाडामुळे ते गेल्या दोन महिन्यांपासून पृथ्वीवर परत येऊ शकले नाहीत. नासाचे म्हणणे आहे की, जर स्टारलाइनर्स परत येणे सुरक्षित मानले गेले नाही तर ते फेब्रुवारी 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनसह पृथ्वीवर परत येतील.

हेही वाचा>>>

Women Health : काय सांगता? जास्त प्रवास केल्याने मासिक पाळीवर परिणाम होतो? डॉक्टर काय म्हणतात...जाणून घ्या...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget