Propose Day 2022: माझी होशील ना? 'प्रपोज डे' च्या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला असं करा प्रपोज.....
Propose Day 2022: व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा आजचा दिवस म्हणजे खासच.
![Propose Day 2022: माझी होशील ना? 'प्रपोज डे' च्या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला असं करा प्रपोज..... Valentine Week 2022 Propose Day how to propose what are the ways to propose Propose Day 2022: माझी होशील ना? 'प्रपोज डे' च्या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला असं करा प्रपोज.....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/08/344d57327ce6ae8e3ef73c894d35b4a4_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Valentine Week 2022: व्हॅलेंटाईन डेची सुरुवात रोज डेने सुरू झाल्यानंतर त्याच्या पुढचा दिवस म्हणजे प्रपोज डे. आपल्या आवडत्या व्यक्तीला मनातील भावना सांगण्याचा आजचा दिवस. वर्षभर आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यास धजावत नसलेल्या व्यक्तींच्यासाठी आजचा दिवस हा काहीसा धीर देणारा. धाडस करुन प्रेम व्यक्त करु इच्छिणारे अनेक तरुण-तरुणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.
प्रपोज डे म्हणजे खास दिवस...आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही. मग आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज कशा पद्धतीनं करायचं हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मग अशा व्यक्तींसाठी काही खास मार्ग आहेत. या मार्गाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करु शकता.
सुंदर ठिकाणी अथवा निसर्गाच्या सानिध्यात प्रपोज करा
तुमच्या आवडत्या व्यक्तीला तिच्या आवडत्या, सुंदर ठिकाणी प्रपोज कराल, तुमचे प्रेम वेगळ्या अंदाजात व्यक्त कराल तर ते अधिक चांगलं ठरेल. तर मग तुमच्या आवडत्या व्यक्तीला एखाद्या सुंदर ठिकाणी घेऊन जा. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या आणि जोडीदाराच्या आयुष्यात कायम लक्षात राहील.
मेरा प्रेम पत्र पढके...
पूर्वीच्या काळी प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्राचा सर्वाधिक वापर केला जायचा. आज प्रेम पत्र देणं ही गोष्ट जुनी झाली असली तरी एक वेगळी कल्पना होऊ शकते. सुंदर अशा काव्यात्मक शब्दांच्या माध्यमातून आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल आपल्या भावना व्यक्त करु शकता. त्यात शायरी वा गाण्यांच्या काही ओळींचा वापर करु शकता.
सुंदर असं एक गिफ्ट द्या
आपल्या आवडत्या व्यक्तीला सुंदर असं गिफ्ट देणं, सुंदर फुल देणं प्रत्येकालाच आवडेल. त्यामुळे समोरची व्यक्ती आनंदित होईल. तुम्हीही तुमच्या आवडत्या व्यक्तीला एखादं गिफ्ट आणि त्या सोबत गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करु शकता. तसंच शायरी किंवा कविताचा वापर केला तर मग तुम्हाला प्रेमात यश मिळणं अधिक शक्य आहे.
लंच किंवा डिनर डिप्लोमसी
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रपोज करताय तर त्या व्यक्तीला लंच किंवा डिनरला घेऊन जाणं कधीही चांगलं. त्यातही जर कॅन्डल लाईट डिनरचा बेत आखला तर सोन्याहून पिवळं... त्या ठिकाणी डेजर्ट किंवा वाईनच्या सोबतीने तुम्ही त्या व्यक्तीला अंगठी देऊन प्रपोज करु शकता.
भन्नाट कल्पना राबवा
आजचा दिवस वेगळा करण्यासाठी तुम्ही काही वेगळी कल्पना निवडू शकता. जसं तुम्ही तुमच्या पार्टनरचे आतापर्यंतचे सर्व फोटो एकत्र करुन त्याचा अल्बम करु शकता आणि तो गिफ्ट करु शकता. त्या अल्बमच्या माध्यमातून आपण आपले प्रेम व्यक्त करु शकता.
फिल्मी डायलॉगचा वापर
फिल्मी डायलॉगचा वापर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला फिल्मी डायलॉगच्या माध्यमातून प्रपोज करु शकता. जसं 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातील एक सुंदर डायलॉग आहे, 'एक मर्द का सिर तीन औरतों के आगे झुकता है! मॉं के आगे, एक दुर्गा मॉं के आगे और तुम...'
'फना चित्रपटातील एक डायलॉग आहे, 'हमसे दूर जाओगे कैसे, दिल से हमें भुलाओगे कैसे, हम वो खुशबू हैं जो सांसों में बसते हैं, खुद की सांसों को रोक पाओगे कैस.' तसेच 'कल हो ना हो' या चित्रपटातील एक डायलॉग आहे, 'प्यार तो बहुत लोग करते है, लेकिन मेरे जैसा प्यार कोई नही कर सकता, क्यूंकी किसी के पास तुम जो नहीं हो.' अशा काही डायलॉगचा वापर केल्याने तुमचे प्रपोज अधिक खुलण्याची शक्यता आहे.
हात हातात घ्या अन्...
तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करताना तिचा हात हातात घ्या...नजर नजरेला भिडवा आणि आत्मविश्वासाने तिला प्रपोज करा. प्रेमळ स्पर्श हा तुमचं प्रेम अधिक खुलवेल आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)