(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel Tips : तुम्ही पहिल्यांदाच सोलो ट्रिपचा आनंद घेताय? तर, 'या' चुका टाळा
Travel Tips : नवीन ठिकाणी प्रवास करणे खूप रोमांचक आहे. पण, एकट्याने प्रवास करणे त्याहूनही जास्त रोमांचक आणि आव्हानात्मक आहे.
Travel Tips : मित्र-मैत्रिणींबरोबर, कुटुंबीयांबरोबर बाहेर फिरायला, ट्रिपला जायला तर सर्वांनाच आवडतं. पण, सोलो ट्रिपचा (Solo Trip) आनंदा हा काही वेगळाच असतो. काहींना सोलो ट्रिपची सवय असते. मात्र, तुम्ही जर पहिल्यांदा सोलो ट्रिप करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्या ट्रिपचा आनंद द्विगुणित आणि संस्मरणीय होईल. अशा वेळी सोलो ट्रिपला जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. तथापि, तुम्ही तुमच्या प्रवासात काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुमची सहल उध्वस्त होणार नाही. आम्हाला कळवा, काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या सोलो ट्रिपमध्ये काही चुका टाळू शकता.
जास्त पॅकिंग करू नका
लांबच्या ठिकाणी ट्रिपला जायच्या नादात अनेकदा आपण सर्वच गोष्टी बॅगेत भरतो. अशाने बॅग तर जड होतेच पण प्रवासाचाही आनंद घेता येत नाही. जास्त सामान पॅक केल्यामुळे तुम्हाला सामान उचलण्यात अडचण येऊ शकते. म्हणून, आपल्याला आवश्यक असलेल्या सामानाचीच पॅकिंग करा.
ओव्हर शेड्युलिंग करू नका
अनेकदा असं होतं की, दूरच्या ठिकाणी जायचं आहे म्हटल्यावर सर्वच ठिकाणं फिरावीशी वाटतात. अशा वेळी प्रत्येक मिनीटं खर्च करण्याच्या नादात शरीराला थकवा तर जाणवतोच पण त्याचबरोबर त्या ठिकाणचा आनंदही घेता येत नाही. त्यामुळे तुम्ही खूप थकून जाण्याची शक्यता असते यासाठी ओव्हर शेड्युलिंग करू नका..
विचारपूर्वक बजेट तयार करा
तुम्ही सोलो ट्रिपला जात असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेटचे नियोजन करणे. त्यामुळे बजेट बनवायला विसरू नका. तसेच, अधिक पैसे घ्यायला विसरू नका. जेणेकरून वस्तूंच्या किंमती कमी-जास्त झाल्यास तुम्हाला फारसा फरक पडणार नाही.
कुटुंबाच्या संपर्कात राहा
सोलो ट्रिपला जाताना आपल्यालाच आपल्याकडे लक्ष द्यावं लागतं. एक प्रकारचं हे आव्हानच असतं. अशा वेळी आपल्या कुटुंबीयांना आपली खूप काळजी असते. यासाठी घरातील कोणत्याही सदस्याशी संपर्कात राहा. जेणेकरून तुम्ही अडचणीत आल्यास किंवा तुम्ही अडकल्यास, तुम्ही मदतीसाठी त्यांच्याशी संपर्कात राहू शकता.
प्लॅन बी तयार ठेवा
काहीवेळा असे होऊ शकते की, रिजर्वेशन रद्द झाल्यास किंवा तुम्हाला जागा आवडत नसल्यास तुमच्या प्रवासाचे प्लॅन बिघडू शकतात. त्यामुळे तुमच्या सहलीचा प्लॅन बी तयार करा जेणेकरून तुमच्या सहलीचा आनंदही कमी होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.