(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Travel : गुलाबी थंडी.. मुलांच्या सुट्टीचा महिना लावा सत्कारणी! भारतीय रेल्वेकडून नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारत फिरण्याची संधी
Travel : भारतीय रेल्वेच्या या टूर पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही कसलंही टेन्शन न घेता फिरू शकता. यात हॉटेलपासून नाश्ता, प्रवास विमा अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
Travel : नोव्हेंबर महिना खास असतो... म्हटला तर मुलांच्या सुट्टीचा काळ... गुलाबी थंडीचा महिना..अशात जर तुम्ही कुठे फिरायचा प्लॅन ठरवत असाल तर भारतीय रेल्वे तुम्हाला उत्तम संधी देत आहे. भारतीय रेल्वे म्हणजेच IRCTC ने कमी बजेटमध्ये विविध ठिकाणी फिरण्याचं एक खास टूर पॅकेज आणलंय. ज्याच्या माध्यमातून तुम्ही कसलंही टेन्शन न घेता फिरू शकता. या पॅकेजमध्ये हॉटेलपासून नाश्ता, प्रवास विमा अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून बुकिंग करता येईल.
IRCTC कडून एक उत्तम संधी आणली..!
भारतीय रेल्वे तुम्हाला नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारत फिरण्याची संधी देत आहे. IRCTC ची ही एक उत्तम संधी असून तुम्हाला दक्षिण भारतातील सुंदर ठिकाणांना भेट द्यायची असेल, तर हे पॅकेज उत्तम आणि परिपूर्ण आहे, या पॅकेजनुसार तुम्ही नोव्हेंबरमध्ये कन्याकुमारी, मदुराई, रामेश्वरम येथे सहलीचे नियोजन करू शकता. 6 दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये निवास, भोजन आणि विमान तिकिटांचा समावेश आहे. पॅकेजशी संबंधित इतर महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर तुम्हाला मदुराई, रामेश्वरम, कोवलम आणि कन्याकुमारीला जायचे असेल तर तुम्ही IRCTC च्या या शानदार टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.
Prepare for a journey filled with history and culture. Explore the wondrous sights of South India with IRCTC Tourism.
— IRCTC (@IRCTCofficial) July 12, 2024
Destinations Covered – Madurai – Rameswaram – Kanniyakumari – Thiruvananthapuram - Kovalam
Package Price - ₹ 39,100/- onwards per person*
For a memorable… pic.twitter.com/te45xcLrLW
पॅकेजचे नाव- दक्षिण भारत टूर
पॅकेज कालावधी- 5 रात्री आणि 6 दिवस
प्रवास - फ्लाइट
कव्हर केलेले डेस्टिनेशन- कन्याकुमारी, कोवलम, मदुराई, रामेश्वरम, त्रिवेंद्रम
कधी प्रवास करू शकाल? - नोव्हेंबर
तुम्हाला 'या' सुविधा मिळतील
राहण्यासाठी हॉटेलची सोय असेल.
जेवणाची सुविधा उपलब्ध असेल.
तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही मिळेल.
प्रवासासाठी 'इतकी' रक्कम आकारली जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 53,500 रुपये मोजावे लागतील.
दोन लोकांना प्रति व्यक्ती 40,800 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 39,100 रुपये शुल्क भरावे लागेल.
तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल.
बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 32,300 रुपये द्यावे लागतील
बेडशिवाय तुम्हाला 29,000 रुपये द्यावे लागतील.
अशी करा बुकिंग
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : पांढरा शुभ्र..स्वर्गाप्रमाणे भासणारा 'चेन्नई एक्सप्रेस' मधील 'हा' तोच लोकप्रिय धबधबा! आश्चर्यकारक तथ्यं जाणून वाटेल नवल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )