एक्स्प्लोर
टिप्स : फ्रीजची स्वच्छता करण्याची योग्य पद्धत
फ्रीज स्वच्छ केला नाही तर त्यामधून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. सोबतच त्यामधील पदार्थही लवकर खराब होतात. त्यामुळे फ्रीजची सफाई करणं गरजेचं आहे.
मुंबई : ज्या प्रकारे घरातील वस्तूंची वेळोवेळी साफसफाई करणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे फ्रीजही ठराविक काळाने स्वच्छ करणं आवश्यक असता. फ्रीज स्वच्छ केला नाही तर त्यामधून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. सोबतच त्यामधील पदार्थही लवकर खराब होतात. त्यामुळे फ्रीजची सफाई करणं गरजेचं आहे.
फ्रीज स्वच्छ करण्याच्या सोप्या पद्धती
- दोन आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रीजची साफसफाई करावी
- फ्रीज स्वच्छ करण्यापूर्वी बंद करुन, त्यातील खराब किंवा नको असलेले पदार्थ काढून टाकावेत
- फ्रीज डी-फ्रॉस्ट करा, त्यानंतर बेसवर एक जाड पेपर टाका, जेणेकरुन बर्फ विरघळून पाणी पेपरवर पडेल आणि ते शोषलं जाईल
- सफाई करताना लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करुन वापरल्यास फ्रीजमध्ये दुर्गंधी येत नाही
- दही किंवा दूध जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवल्याने वास पसरतो, अशावेळी वाटीत चुना घेऊन तो फ्रीजमध्ये ठेवावा
- कॉफी बीन्स एका वाटीत घेऊन फ्रीजमध्ये ठेवल्यास दुर्गंधी निघून जाते
- खाण्याचा सोडा आणि पाणी एकत्र करुन फ्रीज स्वच्छ करावा
- फ्रीजमध्ये खाण्याचा सोडा ठेवल्यामुळे त्यामधील दुर्गंधी जाते
- फ्रीजमध्ये लिंबू किंवा संत्र्याच्या साली कापून ठेवल्याने दुर्गंधी शोषली जाते.
- फ्रीजच्या दारात रबरी गास्केटला टाल्कम पावडर लावून ते कोरड्या कपड्याने पुसून घ्यावं
- फ्रीज नेहमी कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement